ट्विटरवर विराटचं राज्य, हा पराक्रम करणार ठरला पहिला क्रिकेटर

शुभम कुलकर्णी

Updated on: Sep 13, 2022 | 5:45 PM

विराटवर ट्विटरचं राज्य असलं तरी धोनीचं काय, असाही प्रश्न तुम्हाल पडला असेल. यासाठी सविस्तर वाचा...

ट्विटरवर विराटचं राज्य, हा पराक्रम करणार ठरला पहिला क्रिकेटर
विराट कोहली
Image Credit source: social

मुंबई : ट्विटरवर (Twitter) कोण सर्वाधिक लोकप्रिय, असं म्हटलं तर तुम्ही विचार करायला लागाल. पण, हाच प्रश्न तुम्हाला एक विशिष्ट क्षेत्र घेऊन विचारल्यास तुमच्या समोर त्या क्षेत्रातील लोकप्रिय लोकांची नावं समोर येतील. समजा क्रिकेट (Cricket) क्षेत्राचं नाव घेतल्यास कोण सर्वाधिक लोकप्रिय आहे, कोण ट्विटरवर फेम आहे, याविषयी तुम्ही विचार करायला लागाल. तर क्रीडा (Sports) क्षेत्रात ट्विटरवर राज्य करणाऱ्या अशाच एकाचं नाव आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

विराटचे किती फॉलोअर्स?

क्रिकेटमध्ये किंवा क्रीडा क्षेत्रातून विराट कोहलीचा ट्विटरवर चांगलाच गाजावाजा दिसतोय. विराट कोहलीचे ट्विटरवर पाच कोटी फॉलोअर्स झाले आहेत. कोहली जगातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे. यानं इंस्टाग्राम आणि ट्विटर दोन्हीवर 5 कोटीहून अधिक लोक फॉलो करतात. 2020 मध्येच विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स होते. या वर्षी जून महिन्यात कोहलीने इंस्टाग्रामवर 200 मिलियन फॉलोअर्स पूर्ण केले. विराटशिवाय इतर कोणत्याही क्रिकेटपटूला ही कामगिरी करता आलेली नाही.

ट्विटरवर विराटचं राज्य

आशिया कपमध्ये विराटची कारकिर्द पाहिल्यास…

  1. भारताच्या शेवटच्या सामन्यात विराट कोहलीने 122 धावांची शानदार खेळी केली.
  2. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील विराटचे हे पहिले शतक आहे. यापूर्वी त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 94 होती. या खेळीसह विराट टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज ठरला.
  3. नोव्हेंबर 2019 नंतर त्याने प्रथमच शतक केले. याआधी बांगलादेशविरुद्धच्या डे-नाईट कसोटीत कोहलीने फटकेबाजी करत शतक झळकावले होते.
  4. आता टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावल्यानंतर कोहली फॉर्ममध्ये परतण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, चाहत्यांचा वाढता पाठिंबा त्यांना अधिक आत्मविश्वास देईल.

क्रिकेट स्टार्सचे फॉलोअर्स

विराट कोहलीशिवाय महेंद्रसिंग धोनी हा भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटर आहे. पण, धोनी ट्विटरवर सक्रिय नाही. या कारणास्तव त्याच्या खात्यातून ब्लू टिक देखील काढून टाकण्यात आली होती. पण, त्याचे खाते पुन्हा व्हेरिफाईड केले गेले. धोनीनं शेवटचे ट्विट जानेवारी 2021 मध्ये केले होते. धोनीला जवळपास 84 लाख लोक फॉलो करतात. त्याचवेळी 3.78 कोटी लोक सचिनला फॉलो करतात.

रोनाल्डो पहिल्या स्थानावर

ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या स्थानावर आहे. जवळपास 95 कोटी लोक त्यांना ट्विटरवर फॉलो करतात. या बाबतीत फुटबॉलपटू वेन रुनी दुसऱ्या स्थानावर आहे. बास्केटबॉलचा केविन ड्युरंट तिसऱ्या तर फुटबॉलपटू नेमार चौथ्या क्रमांकावर आहे. तर विराट पाचव्या क्रमांकावर आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI