AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पराभवानंतरचं विराटचं वागणं तो आदर्श खेळाडू असल्याचं दाखवून देतं,’ माजी पाकिस्तानी खेळाडू सना मीरकडून कोहलीचं कौतुक

टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी एकतर्फी लढाई पाहायला मिळाली. हा सामना पाकिस्तानने अगदी सहज खिशात घालत 10 विकेट्सनी विजय मिळवला.

'पराभवानंतरचं विराटचं वागणं तो आदर्श खेळाडू असल्याचं दाखवून देतं,' माजी पाकिस्तानी खेळाडू सना मीरकडून कोहलीचं कौतुक
सना मीर
| Edited By: | Updated on: Oct 26, 2021 | 4:05 PM
Share

दुबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये (T20 World Cup 2021) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी एकतर्फी लढाई पाहायला मिळाली. हा सामना पाकिस्तानने अगदी सहज खिशात घातला. संपूर्ण भारतभर हा सामना मोठ्या उत्साहात पाहिला गेला. भारतीय चाहत्यांचा हिरमोड झाला पण हा सामना अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. सामन्यानंतर  सोशल मीडियावर विविध मीम्स आणि दिग्गजांच्या कमेंट्स येतच होत्या. पण या सर्वातही कर्णधार कोहलीचा मोठेपणा सर्वांना पाहायला मिळाला.

पराभूत झाल्यानंतर कसलेही आढेवेढे न घेता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानी खेळाडूंचं अभिनंदन केलं. तसेच पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला मिठी मारली. विराट आणि रिझवानचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. दरम्यान यावरचं माजी पाकिस्तानी कर्णधार सना मीरनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. मीरने आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर तिच्या कॉलममध्ये लिहिलं आहे की, ‘विराट कोहलीने अतिशय शिष्टाईने पराभव स्वीकारत खेळ भावना दाखवली. त्याचं मी कौतुक करते. यातूनच त्याच्यातील ग्रेट प्लेयर दिसून येतो आणि पुनरागमन करण्याची ताकदही त्याच्यात असल्याचं दिसून येतं.’

व्हिडीओ पाहा

बाबरचंही केलं कौतुक

पाकिस्तानच्या विजयानंतर सना मीरने त्यांचा कर्णधार बाबरने संपूर्ण सामन्यात दाखवलेल्या वागणूकीचंही कौतुक केलं. या मोठ्या विजयानंतरही त्याने विजयाच्या उत्सवात आनंदी होण्यापेक्षा पुढील सामन्यावर लक्ष केंद्रीत केलं. त्यामुळे मीरच्या मते अशा वागणूकीमुळे पाकिस्तान स्पर्धेतील आवडती टीम झाली आहे.

इतर बातम्या

‘हा तर इस्लामचा विजय’, पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग

India vs Pakistan : वरुण चक्रवर्तीसारखे बोलर तर पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्येपण मिळतील, माजी पाक कर्णधाराचा हल्लाबोल

India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ

(Virat kohli handled defeat with grace shows he is great player says Cricketer sana mir)

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.