AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : तो 18 वर्षे.., आरसीबीने IPL ट्रॉफी जिंकल्यानंतर विजय मल्ल्या विराटबाबत स्पष्टच म्हणाले

Vijay Mallya On Virat Kohli IPL 2025 Final : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियावर पोस्टचा महापूर आला आहे. आरसीबीचे माजी मालक विजय मल्ल्या यांनी पोस्ट करत तिघांची नावं घेतली आहेत. जाणून घ्या.

Virat Kohli : तो 18 वर्षे.., आरसीबीने IPL ट्रॉफी जिंकल्यानंतर विजय मल्ल्या विराटबाबत स्पष्टच म्हणाले
Virat Kohli and Vijay MallyaImage Credit source: IPL/Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 04, 2025 | 3:09 AM
Share

रजत पाटीदार याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल ट्रॉफी जिंकली आणि 18 वर्षांची प्रतिक्षा अखेर संपवली. रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल 2025 चा महाअंतिम सामना खेळवण्यात आला. पंजाबला या सामन्यात 191 धावांचा पाठलाग करताना 184 धावांपर्यंतच पोहचता आलं. शशांक सिंह याने पंजाबला जिंकवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र शशांकचे प्रयत्न अपुरे ठरले. पंजाबला 20 ओव्हरमध्ये 184 धावांपर्यंतच पोहचता आलं. आरसीबीने अशाप्रकारे महाअंतिम सामना 6 धावांनी जिंकला आणि आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. पंजाबसाठी शंशाकने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. शशांकने 30 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 61 रन्स केल्या.

आरसीबीच्या या विजयामुळे विराट कोहलीला, टीममधील सर्व खेळाडूंना, सपोर्ट स्टाफला आणि चाहत्यांना आनंद झाला. इतकंच नाही तर, आरसीबीचे माजी मालक विजय मल्ल्या यांनाही आनंद झाला. आरसीबीच्या विजयामुळे विजय मल्ल्यांचं स्वप्नही पूर्ण झालं. आरसीबीच्या या विजयानंतर विजय मल्ल्या यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन पोस्ट केली. मल्ल्यांनी या पोस्टमध्ये ख्रिस गेल, एबी डीव्हीलियर्स आणि विराट कोहली या तिघांची नावं घेतली. मल्ल्या विराट कोहली याच्याबाबत काय म्हणाले? हे जाणून घेऊयात.

विजय मल्ल्या विराटबाबत काय म्हणाले?

“मी जेव्हा आरसीबीची स्थापना केली तेव्हा आयपीएल ट्रॉफी बंगळुरूला यावी, असं माझं स्वप्न होतं. मला तरुणपणी महान किंग कोहलीची निवड करण्याचे सौभाग्य मिळाले. तो 18 वर्षे आरसीबीसोबत राहिला हे उल्लेखनीय आहे. ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेल आणि आरसीबीच्या इतिहासाचा अविभाज्य भाग राहिलेल्या ‘मिस्टर 360’ एबी डिव्हीलयर्स याची निवड करण्याचा मानही मला मिळाला”, असं म्हणत मल्ल्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आरसीबीच्या विजयाबाबत प्रतिक्रिया दिली.

विजय मल्ल्या यांची एक्स पोस्ट

विजय मल्ल्या यांचं स्वप्न पूर्ण

“शेवटी आयपीएल ट्रॉफी बंगळुरूमध्ये आली. माझे स्वप्न साकार करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन आणि पुन्हा एकदा आभार. आरसीबीचे चाहते सर्वोत्तम आहेत. ते आयपीएल ट्रॉफीसाटी पात्र आहेत. ई साला कप बंगळुरू बरुथे!”, असं म्हणत मल्ल्यांनी चाहत्यांचे आभार मानले.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.