ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी विराट कोहलीचे गूढ वढवणारं ट्विट, नव्या चर्चेला उधाण; झालं असं…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 ऑक्टोबरपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची निवड झाली आहे. जवळपास सात महिन्यानंतर दोघेही मैदानात उतरतील. तत्पूर्वी विराट कोहलीचं एक ट्वीट चर्चेत आलं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका आणि पाच सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून भारतीय संघ रवाना झाला आहे. या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांना त्यांचे हिरो पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहेत. कारण हे दोघांनी टी20 आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर फक्त वनडे खेळणार असल्याचं आता स्पष्ट आहे. खरं तर विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. असं असताना विराट कोहलीचं ट्वीटमुळे नव्या चर्चेला उधाण आलं आहे. कारण या ट्वीटचा अर्थच लागत नाही. कोणासाठी आणि कशासाठी लिहिलं हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे विराट कोहलीच्या मनात नेमकं काय सुरु आहे याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. विराट कोहली सहसा सोशल मीडियावर आपले वैयक्तिक विचार शेअर करत नाही. मग असं काही ट्वीट करण्याचं नेमकं कारण काय?
विराट कोहलीने त्याच्या एक्स अकाउंटवर लिहिलं त्याचा अर्थ असा आहे की, ‘जेव्हा तुम्ही खरोखर हरता, तेव्हा तुमाही हार मानण्याचा निर्णय घेता.’ त्याच्या या क्रिप्टीक पोस्टनंतर चाहत्यांनी त्याच्या प्रश्नांचा मारा केला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधीच असं का पोस्ट केलं वगैरे वगैरे.. अनेकांनी तर ही पोस्ट टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसाठी असल्याचं म्हंटलं आहे. पण हे ट्वीट व्हायरल होताच विराट कोहलीने स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.
The only time you truly fail, is when you decide to give up.
— Virat Kohli (@imVkohli) October 16, 2025
विराट कोहलीने त्यांच्या ट्विटवर एका जाहिरातीचा व्हिडिओ शेअर करून उत्तर दिले. त्यामुळे चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. त्यामुळे गेल्या काही तासात रंगलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. विराटने स्प्, त्या जाहिरातीशी संबंधित आहे. असे करून त्यांनी सोशल मीडियावर सुरू झालेल्या वादाला पूर्णविराम दिला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.
