T20 वर्ल्ड कपपूर्वी विराट कोहलीला मोठा दिलासा, दोन धडाकेबाज फलंदाज फॉर्ममध्ये

टी-20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) मुंबई इंडियन्सचे दोन धडाकेबाज फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फॉर्ममध्ये परतले आहेत.

T20 वर्ल्ड कपपूर्वी विराट कोहलीला मोठा दिलासा, दोन धडाकेबाज फलंदाज फॉर्ममध्ये
Virat Kohli - Ishan Kishan

मुंबई : टी-20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) मुंबई इंडियन्सचे दोन धडाकेबाज फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फॉर्ममध्ये परतले आहेत. टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) ही दिलासादायक बातमी आहे. ईशानने सलग दुसऱ्या सामन्यात स्फोटक अर्धशतक झळकावले. किशन आणि सूर्यकुमारच्या झंझावाती अर्धशतकांमुळे मुंबईने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 235 धावांचा डोंगर केल्या, जी आयपीएलच्या इतिहासातील संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे. (Virat Kohli relieved before T20 World Cup, 2 dangerous batsmen return to form)

आयपीएलच्या साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 42 धावांनी मात करत मुंबईने स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूपासून हैदराबादच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला. इशान किशनच्या 84 आणि सूर्यकुमार यादवच्या 82 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 235 धावांचा डोंगर उभा केला होता. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना निर्धारित 20 षटकात 193 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे मुंबईने या सामन्यात 42 धावांनी मोठा विजय मिळवला.

मुंबईने या सामन्याची सुरुवात धमाकेदार केली होती. किशनने कर्णधार रोहित शर्माच्या साथीने 5.2 षटकात 80 धावांची सलामी दिली. यामध्ये रोहितचं योगदान केवळ 18 धावांचं होतं. रोहितला राशिद खानने माघारी धाडलं. त्यानंतर आलेला हार्दिक पंड्यादेखील (10) मोठी खेळी करु शकला नाही. पंड्यांनंतर कायरन पोलार्ड 13 धावांचं योगदान देऊन माघारी परतला. मात्र इशान किशनने प्रत्येक गोलंदाजाची धुलाई सुरुच ठेवली. त्याने अवघ्या 32 चेंडूत 84 धावांची खेळी केली. या खेळीत 11 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने सामन्याची सूत्र हाती घेतली. त्यानेदेखील हैदराबादच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. सूर्यकुमारने 40 चेंडूत 82 धावांची खेळी केली. या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. या दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

इशानचं सलग दुसरं अर्धशतक

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मागील सामन्यात इशान फॉर्ममध्ये परतला आणि त्याने 25 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 50 धावा केल्या. ईशानने हैदराबादविरुद्ध अवघ्या 16 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, जे आयपीएल 2021 मधील सर्वात जलद अर्धशतक आहे. आयपीएलमध्ये डावाच्या पहिल्या चार षटकांत अर्धशतक करणारा इशान हा दुसरा फलंदाज आहे. फक्त केएल राहुल हा त्याच्यापेक्षा वेगवान कामगिरी करू शकला. त्याने 2018 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स) विरुद्ध 2.5 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या होत्या. नंतर 2019 मध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध चार षटकांत 50 धावा पूर्ण केल्या होत्या. इशान किशन आणि सूर्यकुमार यादवला वर्ल्डकपमध्ये भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकतं. त्यामुळे या दोन खेळाडूंचं फॉर्ममध्ये येणं टीम इंडियासाठी दिलासादायक आहे.

इतर बातम्या

IPL 2021: इशान-सूर्यकुमारच्या धुवांधार फलंदाजीने रेकॉर्ड्सचा पाऊस, एकाच सामन्यात रचले अनेक विक्रम

IPL 2021 : 5 वेळा विजयी, मग यंदा प्ले ऑफमध्ये एन्ट्री का नाही?, रोहित शर्मा म्हणतो, ‘कुणीच दोषी नाही फक्त…’

T20 World Cup : जोर न लावताच भारत पाकिस्तानला नमवेल, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूकडून संघाची कानउघडणी

(Virat Kohli relieved before T20 World Cup, 2 dangerous batsmen return to form)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI