AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: इशान-सूर्यकुमारच्या धुवांधार फलंदाजीने रेकॉर्ड्सचा पाऊस, एकाच सामन्यात रचले अनेक विक्रम

आयपीएलच्या साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 42 धावांनी मात करत मुंबईने स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूपासून हैदराबादच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला होता.

| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 10:53 AM
Share
आयपीएलच्या साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 42 धावांनी मात करत मुंबईने स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूपासून हैदराबादच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला. इशान किशनच्या 84 आणि सूर्यकुमार यादवच्या 82 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 235 धावांचा डोंगर उभा केला होता. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना निर्धारित 20 षटकात 193 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे मुंबईने या सामन्यात 42 धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात मुंबईच्या संघाने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

1 / 7
इशान किशनने हैदराबादविरुद्ध अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक ठोकले. मुंबई इंडियन्सकडून हे सर्वात जलद अर्धशतक आहे. यापूर्वी मुंबईच्या संघातील फलंदाजांनी चार वेळा 17-17 चेंडूत अर्धशतके केली आहेत. किशनने आपल्या खेळीने सर्वांना मागे टाकले आहे. तसेच किशनचे 16 चेंडूत अर्धशतक हे यूएईमधील सर्वात वेगवान आयपीएल अर्धशतक आहे. यापूर्वी हा विक्रम पंजाब किंग्जच्या निकोलस पूरनच्या नावावर होता. त्याने 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 17 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर हैदराबादविरुद्ध सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्यात किशन आता दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे युसूफ पठाण आहे, ज्याने 2014 मध्ये 15 चेंडूत अर्धशतक ठोकले होते.

2 / 7
मुंबईने एका डावात 30 चौकार ठोकले. आयपीएलच्या एका डावात चौकारांची ही दुसरी सर्वोच्च संख्या आहे. या विक्रमाच्या बाबतीत दिल्ली अव्वल स्थानी आहे. दिल्लीने 2017 मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध 31 चौकार फटकावले होते.

3 / 7
या सामन्यात इशान किशन आणि सूर्यकुमार यादवने मुंबईसाठी अनुक्रमे 84 आणि 82 धावा केल्या. आयपीएलमध्ये ही 19 वी वेळ आहे जेव्हा एका संघाच्या दोन फलंदाजांनी 75 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. पण मुंबईकडून ही पहिलीच वेळ आहे. तसेच, अशी पहिलीच वेळ आहे, जेव्हा दोन्ही फलंदाजांनी 200 किंवा त्यापेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटसह 75 हून अधिक धावा केल्या आहेत.

4 / 7
इशान किशनने मुंबईच्या डावाच्या चौथ्या षटकात आपल्या 50 धावा पूर्ण केल्या. फक्त केएल राहुल हा त्याच्यापेक्षा वेगवान कामगिरी करू शकला. त्याने 2018 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (दिल्ली कॅपिटल्स) विरुद्ध 2.5 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या होत्या. नंतर 2019 मध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध चार षटकांत 50 धावा पूर्ण केल्या होत्या.

5 / 7
हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सने त्यांच्या पॉवरप्ले ओव्हर्समध्ये एका विकेटच्या बदल्यात 83 धावा केल्या. पॉवरप्लेमधील ही त्यांची दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी 2018 मध्ये त्याने दिल्लीविरुद्ध एकही विकेट न गमावता 84 धावा केल्या होत्या. यासोबतच हैदराबादविरुद्ध पॉवरप्लेमध्ये दुसरी मोठी धावसंख्याही उभी केली. याआधी 2014 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने एका विकेटच्या बदल्यात 86 धावा केल्या होत्या होत्या.

6 / 7
हैदराबादविरुद्ध मुंबईने नऊ गड्यांच्या बदल्यात 235 धावा केल्या. आयपीएलमधील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी 2017 मध्ये त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 6 बाद 223 धावा केल्या होत्या. त्याचवेळी, यूएईमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मुंबईने आपल्या नावे केला आहे. त्यांनी 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या 228 धावांचा स्कोर मागे टाकला आहे. तसेच हैदराबादविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता मुंबईच्याच नावावर झाला आहे.

7 / 7
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.