Virender Sehwag on Rakesh Jhunjhunwala : एका युगाचा अंत, राकेश झुनझुनवाला यांच्या निधनावर सेहवागचं ट्विट

Rakesh Jhunjhunwala : अब्जाधीश गुंतवणूकदार आणि दिग्गच व्यक्तीमत्व राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62व्या वर्षी मुंबईत निधन झाले. राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानं उद्योग जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Virender Sehwag on Rakesh Jhunjhunwala : एका युगाचा अंत, राकेश झुनझुनवाला यांच्या निधनावर सेहवागचं ट्विट
वीरेंद्र सेहवाग आणि राकेश झुनझुनवालाImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 1:18 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारातील (Share market) ‘बिग बुल’ म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचं आज म्हणजेच रविवारी सकाळी निधन झालं. वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) हा एका युगाचा अंत असल्याचं म्हटलं आहे. रिपोर्ट्सनुसार ते अनेक दिवसांपासून आजारी होते. आकासा एअरच्या उद्घाटन समारंभात ते शेवटी सार्वजनिकरित्या दिसले होते. राकेश झुनझुनवाला यांच्या निधनावर सेहवागनं ट्विट केलं की, ‘शेअर बाजारातील ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं. त्याच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांबद्दल शोक व्यक्त करतो.’  राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यांची कारकिर्द मोठी होती.

माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचं ट्विट

झुनझुनवाला यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील बचतीच्या रकमेतून बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.

हायलाईट्स

  1. झुनझुनवाला यांनी 1985 मध्ये त्यांनी 5000 रुपयांपासून सुरुवात केली
  2. आज झुनझुनवाला यांची गुंतवणूक 11000 कोटींपर्यंत वाढली आहे
  3. झुनझुनवाला यांना बुल मार्केटचा राजा म्हणून ओळखले जातं
  4. झुनझुनवाला यांचा पहिला मोठा नफा 1986 मध्ये 5 लाख होता.
  5. 1986 ते 1989 या काळात झुनझुनवाला यांना सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचा नफा झाला.
  6. 1986 मध्ये टाटा टीचे 5000 शेअर्स 43 रुपयांना झुनझुनवाला यांनी विकत घेतले जे तीन महिन्यांत वाढून 143 रुपये झाले
  7. झुनझुनवाला यांना टाटा टीमधून  3 पट नफा झाला.
  8. 2021 पर्यंत त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक टायटन कंपनीत होती. ज्याची किंमत 7294.8 कोटी रुपये होती.आहे

या कंपन्यांचाही सहभाग

एकदा राकेश झुनझुनवाला यांनी सांगितलं होतं की, सुरुवातीला त्यांनी खूप कमी गुंतवणूक केली होती. विशेष म्हणजे तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 150 अंकांवर होता, जो आता 60 हजारांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. त्यांना भारतीय शेअर बाजाराचे वॉरन बफे असंही संबोधलं जात असे. फोर्ब्सनुसार राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती 5.7 अब्ज डॉलर होती.

पंतप्रधानांचं ट्विट

शेअर बाजारातील ‘बिग बुल’ झुनझुनवाला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलंय की , ‘राकेश झुनझुनवाला एक विनोदी आणि व्यावहारिक व्यक्ती होते. आर्थिक जगतात त्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे.भारताच्या प्रगतीबद्दल ते खूप उत्साही होते. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी संवेदना.’

झुनझुनवाला यांच्याविषयी तुम्हाल हे माहिती आहे का की ते झुनझुनवाला हे Aptech Ltd आणि Hungama Digital Media Entertainment Pvt Ltd चे अध्यक्ष देखील होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.