AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला पाचव्या दिवशी ‘या’ खेळाडूची कमी जाणवणार, वसिम जाफरने कोड्यात घेतले नाव

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामन्यातील भारतीय संघाचा दुसरा डाव सध्या 82 षटकांमध्ये 6 बाद 181 धावा अशा स्थितीत आहे. त्यामुळे सामना जिंकवण्याचा सर्व ताण भारतीय गोलंदाजावर असणार हे नक्की.

भारताला पाचव्या दिवशी 'या' खेळाडूची कमी जाणवणार, वसिम जाफरने कोड्यात घेतले नाव
Wasim Jaffer
| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 1:26 PM
Share

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs Engalnd) यांच्यात लॉर्ड्स मैदानात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात आज सामन्याचा पाचवा आणि अखेरचा दिवस आहे. सामन्यात दोन्ही संघ चांगल्या स्थितीत आहेत. भारताने सहा विकेट गमावत 181 रन केले आहेत. ज्यामुळे 154 धावांची आघाडी देखील घेतली आहे. ऋषभ पंत आणि इशांत शर्मा  नाबाद आहेत. ज्यामुळे भारत किमान 200 धावांची आघाडी घेण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र अखेर सामना जिंकवण्याची सर्व जबाबदारी ही भारतीय गोलंदाजावरच असणार आहे. यालाच अनुसरुन माजी सलामीवीर वसीम जाफर (Wasim jaffer) याने त्याच्या अंदाजात एका खेळाडूचं नाव इशाऱ्यात घेत त्याची कमी भारतीय संघाला पाचव्या दिवशी जाणवेल असं सूचक ट्विट केलं आहे.

जाफर हा कायम कोड्यात ट्विट करत असतो. आताही त्याने असेच एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्याने ‘एक महत्त्वाची गोष्ट नाहीये’ (main character missing) असं कॅप्शन देत दोन फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये चेंडू मैदानावर पडून मोठ्या प्रमाणात माती उडत आहे. अशाप्रकारे माती ही फिरकीपटूंच्या बोलिंगवरच उडते. त्यामुळे हा इशारा थेट आश्विनसाठी असून पाचव्या दिवशी त्याची गैरहजेरी संघाला अडचणीत आणेल, हेच यातून वसिम सूचवू इच्छित असल्याचे म्हटले जात आहे.

अनेकांना जाणवतेय आश्विनची कमी

दुसरे कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा होताच अनेकांनी अश्विनला संघात स्थान न दिल्याच्या निर्णय़ावर टीका केली. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन, भारताचे माजी फलंदाज, वीवीएस. लक्ष्मण आणि आकाश चोप्रा अशा अनेकांनी या गोष्टीवर नाराजी व्यक्त केली. दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्ननेही एक ट्वीट केलं ज्यात त्याने लिहिलं की, ”फिरकीपटू हे कधीही खेळ फिरवू शकतात. मैदानाची स्थिती कशीही असो फिरकीपटूंना खेळवने फायद्याचेच ठरते. केवळ पहिल्या डावाचा विचार करुन तुम्ही संघ निवड करणे चूकीचे आहे. फिरकीपटूचं सामना जिंकवू शकतात.” दरम्यान शेनच्या या ट्विटमुळे विराटने आश्विनला न खेळवण्याचा निर्णय चूकला असल्याचेच जणू त्याने सूचित केले.

हे ही वाचा

IND vs ENG : शर्मा आणि कोहली मैदानाबाहेरुन पंतच्या मदतीला, खराब प्रकाशमानामुळे खेळ थांबवण्याचा सल्ला देतानाचा भन्नाट VIDEO व्हायरल

IND vs ENG : रहाणेचं अर्धशतक, चौथ्या दिवसअखेर भारताची 6 बाद 181 धावांपर्यंत मजल, रिषभ पंतवर मदार

पुजाराच्या बॅटिंगवर सगळीकडून टीकेची झोड, आता दिग्गज खेळाडू म्हणतो, ‘द वॉल’च्या जागी सूर्यकुमारला खेळवा!

(Wasim jaffer hints that team india will miss r ashwin on 5th day at lords test by his tweet)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.