AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs SRH IPL 2022: राशिद-राहुलची तुफानी बॅटिंग, उमरानचे परफेक्ट यॉर्कर, नताशाचा डान्स Special High lights Video पाहा

GT vs SRH IPL 2022: तिथून गुजरातने विजय खेचून आणला. राहुल तेवतिया आणि राशिद खानने आज कमाल केली. त्यांनी क्रिकेट रसिकांना आज आपल्या खेळाने जिंकलं.

GT vs SRH IPL 2022: राशिद-राहुलची तुफानी बॅटिंग, उमरानचे परफेक्ट यॉर्कर, नताशाचा डान्स Special High lights Video पाहा
Image Credit source: IPL
| Updated on: Apr 28, 2022 | 12:43 AM
Share

मुंबई: क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. क्रिकेटमध्ये कधी काहीही घडू शकतं. T 20 क्रिकेटमध्ये तर कधीही काहीही होऊ शकतं. तिथे कुठल्याच धावसंख्येला सुरक्षित मानता येणार नाही. आजच्या सामन्यात हेच दिसलं. शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) विजयासाठी 35 धावांची गरज होती. सगळ्यांना मनोमन असं वाटलं होतं की, सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers hyderabad) हा सामना जिंकणार. कारण त्यांच्याकडे तसे गोलंदाज आहेत. पण इथेच अंदाज चुकला. राहुल तेवतिया आणि राशिद खानने (Rashid khan) भल्याभल्यांना धक्का देत दोन ओव्हर्समध्ये 35 धावा केल्या आणि गुजरात टायटन्सला एक थरारक विजयाची भेट दिली. यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगच्या मोसमातील एका सर्वोत्तम सामना आज क्रिकेट रसिकांना अनुभवता आला. हा सामना अनेक चढ-उतारांनी भरलेला होता.

T-20 मधला खरा थरार, रोमांच आज प्रेक्षकांनी अनुभवला

पाच बाद 140 अशी स्थिती होती. तिथून गुजरातने विजय खेचून आणला. राहुल तेवतिया आणि राशिद खानने आज कमाल केली. त्यांनी क्रिकेट रसिकांना आज आपल्या खेळाने जिंकलं. T-20 मधला खरा थरार, रोमांच आज प्रेक्षकांनी अनुभवला. राशिद खानने 11 चेंडूत नाबाद 31 धावा फटकावल्या. यात चार सिक्स होते. राहुल तेवतिया 21 चेंडूत 40 धावांवर नाबाद राहिला. त्याने चार चौकार आणि दोन सिक्स मारले.

उमरान मलिकने कशा वाजल्या काठ्या त्याचा ड्रीम स्पेल पाहण्यासाठी इथे क्लिक करा

इथे क्लिक करुन राहुल तेवतियाची तुफानी बॅटिंग चुकवू नका

राशिद खानचे मॅचविनिंग सिक्सेस पहा

नताशाने आनंदाने मारल्या उड्या इथे क्लिक करुन पहा 

उमरान मलिकने जिंकलं

गुजरातने हा सामना जिंकला असला, तरी सनरायजर्स हैदराबादच्या एका खेळाडूने आज जबरदस्त कामगिरी केली. आयपीएल सुरु झाल्यापासून त्याच्या नावाची चर्चा आहे, तो म्हणजे उमरान मलिक. उमरानने आज भेदक स्पेल दाखवला. त्याने चार षटकात 25 धावा देत पाच विकेट काढल्या. त्याने एकट्याने गुजरातचा निम्मा संघ गारद केला. महत्त्वाच म्हणजे त्याने काढलेल्या चार विकेट या क्लीन बोल्डच्या होत्या. त्याच्या परफेक्ट यॉर्करचं गुजरातच्या फलंदाजांकडे कुठलही उत्तर नव्हतं. त्यामुळे या युवा गोलंदाजाचं कराव तेवढं, कौतुक थोडं आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.