WCL 2024 : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेमी फायनल, किती वाजता आणि कुठे फुकटात पाहता येणार? जाणून घ्या
WCL 2024 IND vs AUS Live Streaming : टीम इंडियाचा दोनवेळा फायनलमध्ये पराभव करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला लोळवण्यासाठी सीनियर टीम इंडिया तयार आहे. काही वेळात सेमी फायनल सामना होणार आहे.

टी-20 वर्ल्ड कपवर टीम इंडियाने नाव कोरत इतिहास रचला. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आणि अफगाणिस्तानने कांगारूंना पराभूत करत बाहरेचा रस्ता दाखवला होता. आज परत एकदा भारत आणि ऑस्ट्रिलिया यांच्यात सेमी फायनल सामना होणार आहे. या सामन्याकडे सर्वांंचं लक्ष लागून असणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स या स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया एकेमकांना भिडणार आहेत. हा सामना आज 12 जुलैलाच होणार असून किती वाजता आणि कुठे पाहता येणार जाणून घ्या.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सचा पहिला हंगाम आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियासह आज पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात सेमी फायनल सामना होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड बाहेर पडले आहेत. भारताचे माजी स्टार खेळाडू सुरेश रैना, हरभजन सिंग, रॉबिन उथप्पा, इरफान पठाण आणि युसूफ पठाण हे युवराज सिंह यांच्या नेतृत्त्वात मैदानात उतरले आहेत. युवराजने ऑस्ट्रेलियाविरूद्ध कायम दमदार फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये त्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरू होण्याची शक्यता आहे. त्याआधी 5 वाजता पहिला सेमी फायनल सामना पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणार आहे. पहिला सेमी फायनल सामना झाल्यावरच दुसऱ्या सेमी फायनल सामन्याला सुरूवात होणार आहे. सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता. जर तुम्हाला हा सामना मोबाईलवर पाहायचा असेल तर फॅन कोड ॲपवर पाहता येणार आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्सच्या पहिल्या हंगामाची फायनल भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे. सेमी फायनल सामन्यात पाकिस्तान संघाने वेस्ट इंडिज आणि भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर गणित जुळणार आहे. जर असं झालं तर परत एकदा हाय व्होल्टेज भारत आणि पाकिस्तान सामन्याचा आनंद क्रिकेट चाहत्यांना मिळू शकतो.
