RR vs MI : हार्दिक लाजीरवाण्या पराभवानंतर मुंबईच्या खेळाडूंवर बरसला, म्हणाला…

Rajasthan Royals vs Mumbai Indians : मुंबई इंडियन्सनने राजस्थानला विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानने हे आव्हान 8 बॉल राखून आणि 1 विकेट गमावून पूर्ण केलं.

RR vs MI : हार्दिक लाजीरवाण्या पराभवानंतर मुंबईच्या खेळाडूंवर बरसला, म्हणाला...
hardik pandya mumbai indians,Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 2:42 AM

मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या 17 व्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानने मुंबईचा वानखेडे स्टेडियमनंतर जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये धुव्वा उडवला. राजस्थानने मुंबईवर 9 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईच्या पराभवामुळे कॅप्टन हार्दिक पंड्याच्या पदरी निराशा आली. हार्दिकने पराभवाचं खापरं टीममधील खेळाडूंवर फोडलं. हार्दिक म्हणाला की टीमने बॅटिंगचा शेवट अपेक्षित न केल्याने 10-15 धावा कमी पडल्या. तसेच बॉलिंगही निष्प्रभ ठरली. मुंबईचा हा आठव्या सामन्यातील पाचवा पराभव ठरला.

कॅप्टन म्हणून हार्दिक पंड्याही अपयशीच ठरला. हार्दिकने 100 च्या स्ट्राईक रेटने 10 बॉलमध्ये 10 धावा केल्या. पंड्या फिनिशीर म्हणून आला. मात्र त्याला आपली छाप सोडता आली नाही. तसेच बॉलिंगनेही त्याने निराशा केली. पंड्याने 2 ओव्हर फेकल्या. या 2 ओव्हरमध्ये त्याने 21 धावा दिल्या. तसेच एकही विकेट घेता आली नाही. पंड्या पराभवानंतर काय म्हणाला जाणून घेऊयात.

समस्या सुरुवातीपासून सुरु झाल्या. तिलक वर्मा आणि नेहल वढेरा या दोघांनी शानदार फलंदाजी केली. मला 2 विकेट्स गमावल्यानंतर 180 धावांपर्यंत पोहचू शकू असं वाटलं नव्हतं. आम्ही बॅटिंगचा शेवट अपेक्षित करु न शकल्याने 10-15 धावा कमी पडल्या. स्टंपनुसार बॉलिंग करायची होती. मात्र पावरप्लेमध्ये कमी पडलो. तसेच फिल्डिंगसाठी आमच्यासाठी हा चांगला दिवस नव्हता. एकूणच आम्ही योग्य निर्णय घेतला नाही आणि त्यांनी आम्हाला पछाडलं.

सामन्यानंतर खेळाडूंजवळ जाणं बरोबर नाही. सर्व प्रोफेशनल आहेत. त्यांना त्यांच्या भूमिकेबाबत माहित आहे. या सामन्यातून धडा घेऊन पुढे जावं लागेल. ज्या चुका केल्यात ते सुधाराव्या लागलीत. पुढे जाणं फार महत्त्वाचं आहे. सर्वांना आपल्या चुकांचा स्वीकार करावा लागेल आणि त्यावर मेहनत घ्यावी लागेल, असंही हार्दिकने म्हटलं.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.