AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढच्या वर्षी खेळाडू IPL नव्हे PSL खेळतील, PCB चीफ रमीझ राजांची आवाक्याबाहेरची स्वप्न

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही स्पर्धा सुरु झाल्यापासून या लीगने जगभरातील क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधून घेतलंय. या स्पर्धेमुळे आतापर्यंत अनेक खेळाडू रारोरात सुपरस्टार झाले आहे. एका रात्रीत त्यांचं नशीब पालटलं आहे. या स्पर्धेमुळे (IPL) अनेक खेळाडू क्षणात करोडपती बनले.

पुढच्या वर्षी खेळाडू IPL नव्हे PSL खेळतील, PCB चीफ रमीझ राजांची आवाक्याबाहेरची स्वप्न
Ramiz Raja Image Credit source: File
| Updated on: Mar 15, 2022 | 12:16 PM
Share

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ही स्पर्धा सुरु झाल्यापासून या लीगने जगभरातील क्रिकेटरसिकांचं लक्ष वेधून घेतलंय. या स्पर्धेमुळे आतापर्यंत अनेक खेळाडू रारोरात सुपरस्टार झाले आहे. एका रात्रीत त्यांचं नशीब पालटलं आहे. या स्पर्धेमुळे (IPL) अनेक खेळाडू क्षणात करोडपती बनले. आयपीएल … जे जगभरातील क्रिकेटपटूंसाठी त्यांचे कौशल्य दाखवण्याचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे, त्याच आयपीएलला पीसीबी प्रमुख रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी आव्हान दिले आहे. रमीझ राजा यांनी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर ते चेष्टेचा विषय बनले आहेत. रमीझ राजा जे काही म्हणाले ते शब्द लोकांच्या पचनी पडलेले नाहीत? रमीझ राजा म्हणाले जर पाकिस्तान सुपर लीग ऑक्शन मॉडलमधे उतरली तर कोणीही आयपीएल खेळणार नाही.

रमीझ राजा क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाले, ‘आता पीएसएलला ऑक्शन मॉडलमध्ये जाण्याची गरज आहे. मला पुढील वर्षापासून ऑक्शन मॉडेलवर स्विच करायचे आहे. आम्ही या विषयावर फ्रँचायझी मालकांशी बोलू.” रमीझ राजा म्हणाले, ”हा पैशांचा खेळ आहे. जेव्हा पाकिस्तानमध्ये क्रिकेटची अर्थव्यवस्था वाढेल, तेव्हा पाकिस्तानचा सन्मानही वाढेल. पीएसएल हे पाकिस्तान क्रिकेटच्या आर्थिक अर्थव्यवस्थेचे सर्वात मोठे साधन आहे. जर आपण पीएसएलला लिलावाच्या मॉडेलमध्ये घेतले तर फ्रँचायझींची कमाईदेखील वाढेल आणि मग खेळाडू पीएसएल सोडून आयपीएलमध्ये कसे खेळतात ते आपण पाहू.

पीएसएलचा दर्जा वाढवायचा आहे

रमीझ राजा म्हणाले की, मला संपूर्ण पाकिस्तानमध्ये पीएसएलचे आयोजन करायचे आहे. गेल्या हंगामात, ही स्पर्धा केवळ दोन ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. परंतु पुढील हंगामात ही स्पर्धा संपूर्ण पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाऊ शकते. रमीझ राजा म्हणाले, ‘पुढच्या वर्षी पीएसएलचे आयोजन फ्रँचायझींचे होम ग्राउंड आणि प्रतिस्पर्ध्याचे मैदान अशा दोन ठिकाणी करायचे आहे. ज्याद्वारे पीएसएलचा दर्जा वाढवण्याचा आमचा प्रयत्न असेल.

आयपीएल स्पर्धा पीएसएलपेक्षा 15 पट मोठी

रमीझ राजा पीएसएलमध्ये बदल करून आयपीएलला आव्हान देण्याविषयी बोलत आहेत, परंतु सध्या बीसीसीआयच्या या स्पर्धेचा दर्जा संपूर्ण जगात सर्वात मोठा आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. एकीकडे पीएसएलची ब्रँड व्हॅल्यू सध्या 330 मिलियन डॉलर (33 कोटी डॉलर्स) इतकी आहे, तर दुसरीकडे आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू 4.7 बिलियन डॉलर (470 कोटी डॉलर्स) इतकी आहे. रमीझ राजा ज्या पद्धतीने आयपीएलला आव्हान देण्याबाबत बोलत आहेत, त्यामुळे त्यांची खिल्ली उडवली जाईल.

इतर बातम्या

श्रीलंकेवरील मोठ्या विजयामुळे WTC Points Table मध्ये टीम इंडियाला मोठा फायदा

IND vs SL: ‘श्रेयसला माहितीय तो अजिंक्यच्या….’, रोहित शर्मा अय्यरबद्दल बोलला खास गोष्ट

दोन दिवसात ठरणार, हार्दिक पंड्या IPL 2022 मध्ये खेळणार की, नाही, परीक्षा द्यावीच लागेल

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.