विजयाची हमी देता येणार नाही..! टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी उपांत्य फेरीपूर्वी असं का म्हंटलं?

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत इंग्लंड सामना होत आहे. या सामन्यात कोण बाजी मारेल? हे आता सांगणं कठीण आहे. कारण इंग्लंडची कामगिरी या स्पर्धेत चांगली राहिली आहे. तर भारताच्या फलंदाजीत सातत्य नाही. त्यात आता भारतीय प्रशिक्षकांनी विजयाची हमी देता येणार नाही असं सांगितलं आहे.

विजयाची हमी देता येणार नाही..! टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी उपांत्य फेरीपूर्वी असं का म्हंटलं?
विजयाची हमी देता येणार नाही..! टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी उपांत्य फेरीपूर्वी असं का म्हंटलं?
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 04, 2026 | 8:52 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचं कठीण आव्हान आहे. हा सामना भारताला जिंकायचा असेल तर कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. पण स्पर्धेतील कामगिरी पाहता क्रीडाप्रेमीही संभ्रमात पडले आहेत. त्यात भारताचा गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केलने आपलं मत व्यक्त केलं आहे. हा सामना भारताला जिंकायचा असेल तर जिंकण्यावरच लक्ष केंद्रीत करावं लागेल. कारण इंग्लंडचा संघ धोकादायक आहे आणि त्यांच्याविरुद्ध जिंकणं सोपं नाही, असं मोर्ने मोर्केलने सांगितलं आहे. गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धचा विजय आता महत्त्वाचा नाही आणि सध्या हा संघ अत्यंत धोकादायक आहे, असंही मोर्ने मोर्केल म्हणाला. असं सांगत असताना मोर्ने मोर्केल म्हणाले की, आमचा संघ प्रतिभावान आहे आणि कोणताही खेळाडू गरज पडल्यास सर्वोत्तम कामगिरी करू शकतो.

मोर्ने मोर्केलने उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी त्यांनी सांगितलं की, ‘इंग्लंडचा संघ चांगला आहे. ते चांगलं खेळतात. जर तुम्ही त्याने 120 किंवा 150 धावांवर बाद करण्याचा विचार करत असाल तर अशी आशा बाळगणं चुकीचं ठरेल. आम्ही उपांत्य फेरीत आहोत आणि फक्त जिंकूनच येथे पोहोचलो आहोत. आम्हाला माहिती आहे की भारतात विजय आणि पराभवातील अंतर खूप कमी आहे.’ इतकंच काय तर मोर्ने मोर्केलने पुढे सांगितलं की, ‘उपांत्य फेरीत कसं पोहोचलो हे महत्त्वाचं नाही. पुढच्या दोन सामन्यात तुम्ही कशी कामगिरी करता हे महत्त्वाचं आहे.’

मोर्ने मोर्केल म्हणाले की, ‘इंग्लंड हा एक अतिशय हुशार संघ आहे. त्यांच्याकडे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत आणि त्यांच्या फलंदाजीत खोली आहे, ज्यामुळे ते एक अतिशय धोकादायक संघ बनतात.’ मोर्ने मोर्केल पुढे म्हणाले की, ‘”त्यांच्याकडे गोलंदाजीत अनेक पर्याय आहेत. मला वाटते की ते निर्भयपणे टी20 सामने खेळतात, सामना त्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांना एक धोकादायक संघ बनवते. मला वाटते की गुरुवार हा दोन आक्रमक संघांमधील एक रोमांचक सामना असेल.”‘

Follow Us