AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला आशिया कप 2025 ट्रॉफी कधी आणि कशी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण घडामोड

आशिया कप स्पर्धा उलटून 20 दिवसांहून अधिकचा काळ लोटला आहे. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती. मात्र टीम इंडियाला ट्रॉफी काही मिळाली नाही. मोहसिन नक्वी ट्रॉफी घेऊन पळून गेले. आता त्या ट्रॉफीबाबत एक अपडेट समोर आली आहे.

भारताला आशिया कप 2025 ट्रॉफी कधी आणि कशी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण घडामोड
भारताला आशिया कप 2025 ट्रॉफी कधी आणि कशी मिळणार? जाणून घ्या संपूर्ण घडामोडImage Credit source: Francois Nel/Getty Images
| Updated on: Oct 17, 2025 | 9:37 PM
Share

आशिया कप स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली. एकही सामना न गमावता जेतेपदावर नाव कोरलं. भारताने या स्पर्धेत पाकिस्तानला तीन वेळा पराभवाची धूळ चारली. अंतिम सामन्यात तर विजयाचा घास त्यांच्या तोंडून खेचून आणला. भारताने या स्पर्धेत पाकिस्तानशी जवळीक साधेल असा कोणताच निर्णय घेतला नाही. नाणेफेक ते सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. तर अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या नक्वीच्या हातून ट्रॉफी घेण्यासही नकार दिला. पण नक्वीने सर्व मर्यादा ओलांडल्या आणि ट्रॉफी घेऊन पसार झाला. त्यानंतर बीसीसीआय आणि टीम इंडियाच्या चाहत्यांचा संताप झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना 28 सप्टेंबरला झाला होता. ही स्पर्धा संपून आता 20 दिवसांचा काळ लोटला आहे. पण अजूनही भारतीय संघाला ट्रॉफी मिळाली नाही.

रिपोर्टनुसार, आशियाई क्रिकेट परिषदेचा अध्यक्ष आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वीने ट्रॉफी एसीसी कार्यालयात ठेवली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, मोहसिन नक्वीने या ट्रॉफीला कोणालाही हात लावू देऊ नये असे स्पष्ट आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तसेच परवानगीशिवाय कोणीही ही ट्रॉफी कार्यालयाबाहेर नेता कामा नये असे आदेश दिलेत. मग आता टीम इंडियाला ट्रॉफी कधी मिळणार? असा प्रश्न आहे. बीसीसीआय ट्रॉफी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र हा सर्व पेच आता एक बैठकीतच सुटणार असं दिसत आहे. या बैठकीनंतर टीम इंडियाच्या ट्रॉफीचा निकाल लागणार आहे.

28 सप्टेंबरच्या प्रकारानंतर लगेचच दोन दिवसांनी म्हणजेच 30 सप्टेंबरला एसीसीची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली होती. यात बैठकीत ट्रॉफीचा मुद्दा उचलला गेला होता. तेव्हा एसीसीमधील पाच कसोटी खेळणारे देश म्हणजेच भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान याबाबत ठरवतील असं सांगितलं गेलं. ही बैठक आता पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला होणार असं सांगण्यात येत आहे. मोहसिन नक्वी या बैठकीला उपस्थित राहणार की नाही याबाबत अस्पष्टता आहे. पण या बैठकीतच ट्रॉफीबाबत अंतिम निकाल लागणार आहे. दुसरीकडे, बीसीसीआयने ट्रॉफीबाबत अधिकृत असं काही सांगितलेलं नाही. त्यामुळे या बैठकीतच काय ते ठरेल असं स्पष्ट दिसत आहे.

पार्थ पवार 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार? 7 दिवस मुदतवाढ अन्...
पार्थ पवार 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार? 7 दिवस मुदतवाढ अन्....
बाळासाहेबांना ठाकरे बंधूंकडून अभिवादन...उद्यापासून जागा वाटप!
बाळासाहेबांना ठाकरे बंधूंकडून अभिवादन...उद्यापासून जागा वाटप!.
आजारी राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर... भावाच्या हातात हात अन्...
आजारी राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर... भावाच्या हातात हात अन्....
अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा; म्हणाले, मला अभिमान अन् आनंद...प्रकरण काय?
अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा; म्हणाले, मला अभिमान अन् आनंद...प्रकरण काय?.
अर्ज भरण्याची मुदत संपली, शेवटच्या दिवशी मोठी गर्दी, कुठं काय स्थिती?
अर्ज भरण्याची मुदत संपली, शेवटच्या दिवशी मोठी गर्दी, कुठं काय स्थिती?.
...तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या? सुषमा अंधारेंचा थेट सवाल
...तेव्हा दमानिया कुठे गेल्या होत्या? सुषमा अंधारेंचा थेट सवाल.
पुतळ्याचं अनावरण 4 महिने अनावरण का रखडलं? अमित ठाकरेंचा थेट सवाल
पुतळ्याचं अनावरण 4 महिने अनावरण का रखडलं? अमित ठाकरेंचा थेट सवाल.
मोठी बातमी! आता बिबट्याचीही नसबंदी, बिबट्यांची दहशत अन् वावर कमी होणार
मोठी बातमी! आता बिबट्याचीही नसबंदी, बिबट्यांची दहशत अन् वावर कमी होणार.
बिबट्याने उडवली झोप, एकाला पकडलं, दुसऱ्याचा उच्छाद; थेट पडला विहिरीत
बिबट्याने उडवली झोप, एकाला पकडलं, दुसऱ्याचा उच्छाद; थेट पडला विहिरीत.
नीच... जरांगेंचा अजितदादांसह फडणवीसांवर गंभीर आरोप अन् मुंडेंवर निशाणा
नीच... जरांगेंचा अजितदादांसह फडणवीसांवर गंभीर आरोप अन् मुंडेंवर निशाणा.