AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझं फिटनेस कसं आहे? पत्नी संजना गणेशन असा प्रश्न विचारताच जसप्रीत बुमराह म्हणाला…

लीड्स कसोटीत भारताच्या जसप्रीत बुमराहने अपेक्षेप्रमाणे जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताला पहिल्या डावात 6 धावांची आघाडी मिळाली. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी पत्नी संजना गणेशन याने त्याची मुलाखत घेतली. यावेळी तिने फिटनेसबाबत विचारलं.

तुझं फिटनेस कसं आहे? पत्नी संजना गणेशन असा प्रश्न विचारताच जसप्रीत बुमराह म्हणाला...
तुझं फिटनेस कसं आहे? पत्नी संजना गणेशन असा प्रश्न विचारताच जसप्रीत बुमराह म्हणाला...Image Credit source: SCREENSHOT/SONYSPORTS
| Updated on: Jun 23, 2025 | 4:49 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामन्यात चौथा दिवस खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण भारतीय संघ जितक्या धावा अधिक करेल तितकं जिंकण्याची संधी अधिक असेल. पहिल्या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत पाठवला. पण भेदक गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या फिटनेसचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहवरील वर्कलोड कमी करण्याची रणनिती आखण्यात आला आहे. असं असताना पहिल्या डावात 24.4 षटकं टाकणाऱ्या जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशने हीने मुलाखत घेतली. यावेळी संजना गणेशने त्याला फिटनेस आणि बॉडीबाबत प्रश्न विचारले.

संजना गणेशने प्रश्न विचारला की, जसप्रीत, तुझी बॉडी या कसोटीत कसा प्रतिसाद देत आहे? या प्रश्नावर जसप्रीत बुमराह हसला आणि म्हणाला की, ‘सर्व काही ठीक आहे. मी पूर्णपणे फिट आहे आणि गोलंदाजीचा आनंद लुटत आहे.’ जसप्रीत बुमराहच्या या उत्तराने भारतीय क्रीडारसिकांचा जीव भांड्यात पडला आहे.जसप्रीत बुमराहशिवाय इंग्लंडमध्ये विजय शक्य नाही हे स्पष्ट झालं आहे. कारण पहिल्या डावात इतर गोलंदाजांनी विकेट घेतले असले तरी त्यांनी खोऱ्यांनी धावा दिल्यात.

संजना गणेशन एक स्पोर्ट्स विश्लेषक आहे आणि तिने मुलाखतीत बुमराहसोबत त्याच अंदाजात चर्चा केली. त्यामुळे सोशल मीडियावर या जोडीची चर्चा होत आहे. संजना गणेशनने बुमराहला सांगितलं की, सर्वांची इच्छा आहे की तू पूर्ण पाच सामने खेळले पाहीजेत. पण या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. बुमराहने या मालिकेपूर्वीच स्पष्ट केलं आहे की, वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेत मालिकेत पाच सामन्यांचा भाग नसेल.

जसप्रीत बुमराहने पहिल्या डावात 24.4 षटकं टाकली आणि 83 धावा देत 5 गडी बाद केले. यात जॅक क्राउली, बेन डकेट, जो रूट, ख्रिस वोक्स आणि जोश टंग यासारखे फलंदाज होते. तसेच सेना देशात (दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) 150 कसोटी विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई गोलंदाज आहे.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.