AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, Purple Cap : पर्पल कॅपच्या यादीत कोणता खेळाडू आघाडीवर? तुमचा आवडता खेळाडू नेमका कुठे? जाणून घ्या

आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये काल लखनौ विरुद्ध गुजरातमध्ये सामना झाला. यानंतर आयपीएलच्या पर्पल कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया...

IPL 2022, Purple Cap : पर्पल कॅपच्या यादीत कोणता खेळाडू आघाडीवर? तुमचा आवडता खेळाडू नेमका कुठे? जाणून घ्या
यजवेंद्र चहल विकेट घेणाऱ्यां यादीत अव्वलImage Credit source: twitter
| Updated on: May 11, 2022 | 8:56 AM
Share

मुंबई :  आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये काल गुजरात (GT) विरुद्ध लखनौ (LSG) सामना झाला. या सामन्यात गुजरातने लखनौला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य दिले होते. पण केएल राहुलच्या (KL Rahul) लखनौचा डाव 82 धावात आटोपला. राशिद खान काल आपल्या नावाला जागला. त्याच्या लेग ब्रेक गोलंदाजीने कमाल केली. चार ओव्हर्समध्ये 24 धावा देत त्याने चार विकेट घेतल्या. राशिद खानने ऑलराऊंडर दीपक हुड्डाला (27), कृणाल पंड्या (5), जेसन होल्डर (1) आणि आवशे खान (12) या विकेट काढल्या. कृणाल पंड्याचा विकेट तर अप्रतिम होता. राशिद खानने आज अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने कृणाला पंड्याला अप्रतिम गुगलीवर खेळण्यासाठी क्रीझ बाहेर आणलं. कृणालची पावलं क्रीझ बाहेर जाताच विकेटकीपर सहाने कुठलीही चूक केली नाही. त्याने लगेच स्टम्पिंग केलं. दरम्यान, कालच्या सामन्यानंतर पर्पल कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया.

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. त्याने सर्वाधिक 22 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानी वानिंदू हसरंगा आहे. त्याने 21 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानी कागिसो रबाडा आहे. त्याने अठरा विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. चौथ्या स्थानी कुलदीप यादव आहे. त्याने देखील अठरा विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. पाचव्या स्थानी टी नटराजन आहे. त्याने सतरा विकेट घेतल्या आहेत.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा 24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक 22444
कुलदीप यादव21419

कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

राहुल विरुद्ध मोहम्मद शमी जिंकला

काल लखनौची भिस्त प्रामुख्याने कॅप्टन केएल राहुल आणि क्विंटन डि कॉक या जोडीवर होती. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालने क्विंटन डि कॉकला 11 धावांवर बाद केलं. त्यानंतर केएल राहुलला 8 धावांवर मोहम्मद शमीने सहाकरवी झेलबाद केलं. लखनौची इनिंग सुरु होण्याआधी ते हे लक्ष्य सहज गाठतील असं वाटलं होतं. पण गुजरातच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. पावरप्ले पूर्ण होण्याआधीच लखनौचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. लखनौकडून फक्त दीपक हुड्डाने सर्वाधिक 27 धावा केल्या. अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.