AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit sharma: रोहित शर्मामध्ये कॅप्टन म्हणून असं काय वेगळं आहे? टीम इंडिया का जिंकतेय समजून घ्या…

Rohit sharma: विजय विजय असतो. मग तो मायदेशात मिळवलेला असो किंवा परदेशात. जिंकण्यामुळे आत्मविश्वास वाढतो. लढण्याची प्रेरणा मिळते. अवघड परिस्थितीतही टिकून रहाण्याची जिद्द निर्माण होते.

Rohit sharma: रोहित शर्मामध्ये कॅप्टन म्हणून असं काय वेगळं आहे? टीम इंडिया का जिंकतेय समजून घ्या...
एक-दोन खेळाडूंच्या बळावर प्रत्येक वेळी तुम्ही सामना जिंकू शकत नाही. रोहित शर्माला टी 20 साठी जी दमदार टीम बनवायची आहे, त्यामध्ये त्याच्या फलंदाजीची भूमिका सुद्धा महत्त्वाची राहणार आहे.
| Updated on: Mar 01, 2022 | 7:25 AM
Share

विजय विजय असतो. मग तो मायदेशात मिळवलेला असो किंवा परदेशात. जिंकण्यामुळे आत्मविश्वास वाढतो. लढण्याची प्रेरणा मिळते. अवघड परिस्थितीतही टिकून रहाण्याची जिद्द निर्माण होते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर (South Africa Tour) भारतीय संघाचा (Indian Team) हाच आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला होता. कारण कसोटी पाठोपाठ वनडे मालिकेतही आपला दारुण पराभव झाला होता. पण आता भारतीय संघ या पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडला आहे. याचं सर्व श्रेय जातं कॅप्टन रोहित शर्माला. (Rohit sharma) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची सध्या सुसाट वेगाने घोडदौड सुरु आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या संघांविरुद्ध एकापाठोपाठएक मालिका विजय आपण मिळवलेत. रोहित शर्माच्या कॅप्टनशिपमध्ये अशी काय खास बात आहे? त्याने अशी कुठली जादूडी कांडी फिरवलीय की, त्यामुळे भारतीय संघ इतक्या सहजतेने सामने जिंकतोय. ते आपण समजून घेऊया.

‘या’ गुणांमुळे रोहित शर्मा कॅप्टन म्हणून ठरतो वेगळा

कम्युनिकेशन म्हणजे संवाद, व्यक्तीची हाताळणी, ज्यूनियर्सना सम्मान देणं आणि सिनियर खेळाडूंचा योग्य पद्धतीने वापर ही रोहित शर्माची काही वैशिष्ट्य आहेत. जे खेळाडू रोहित शर्मा बरोबर त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेत, ते त्याच्या प्रवृत्तीबद्दल सहज सांगू शकतात. माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि रोहितचा लहानपणापासूनचा मित्र प्रग्यान ओझाने IPL मध्ये सुरुवातीच्या वर्षात रोहितला जवळून बघितलय. दोघे डेक्कन चार्जस संघाकडून एकत्र खेळायचे.

एडम गिलख्रिस्टला याचं श्रेय जातं

“मुंबई इंडियन्सकडून खेळताना रोहित शर्माला खऱ्या अर्थाने IPL मध्ये ओळख मिळाली. पण माझ्या मते ही सुरुवात डेक्कन चार्जसपासूनच झाली होती. एडम गिलख्रिस्टला याचं श्रेय जातं. त्याने रोहितमध्ये काहीतरी पाहिलं व त्याला उपकर्णधार बनवलं. अनेक सिनियर खेळाडू संघात असतानाही त्याने रोहितला उपकर्णधार बनवलं. रोहित परिस्थिती चटकन समजून घेतो व महत्त्वाच्या टिप्स देतो, ज्याचा संघाला फायदा होतो” असं प्रग्यानने सांगितलं. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ओझाने ही माहिती दिली होती.

म्हणून रोहित इतरांपेक्षा ठरतो वेगळा

“एखादा खेळाडू खराब खेळत असेल, तर त्याच्याकडून चांगला खेळ कसा करुन घ्यायचा हे रोहितला चांगलं समजतं. हाच त्याचा गुण त्याला इतरांपेक्षा वेगळा बनवतो. कर्णधार म्हणून रोहित टीममधील सहकाऱ्यांबरोबर बोलतो. संघातील सहकाऱ्यांना त्यांच्या रोलची कल्पना देतो. खेळाडूकडून काय अपेक्षा आहेत? आणि तो प्लेयर स्वत:मध्ये सुधारणा घडवण्यासाठी आणखी काय करु शकतो? याबद्दल त्याच्याशी सल्लामसलत करतो” असं मुंबई इंडियन्स संघातील रोहितचा सहकारी धवल कुलकर्णीने सांगितलं.

रोहित शर्मा आज कॅप्टन म्हणून यशस्वी होतोय, तर त्यामागे हे त्याचे गुण आहेत. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात इशान किशनकडून अपेक्षित कामगिरी होत नव्हती, त्यावेळी सामना संपल्यानंतर रोहित त्याच्याशी चर्चा करताना दिसला होता. वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका सुरु असताना युजवेंद्र चहलने ‘गुगली चेंडू माझ्या लेगस्पिनला अधिक प्रभावी बनवतात, हे मला रोहित शर्माने पटवून दिलं’, असं सांगितलं होतं. रोहित शर्माचे हेच गुण त्याला कॅप्टन म्हणून यशस्वी बनवतात. सध्या भारतीय संघ मायदेशात खेळतोय, त्यामुळे सहाजिकच वातावरण, परिस्थितीचा फायदा मिळतोय. पण रोहितची खरी परीक्षा परदेश दौऱ्यांमध्ये असेल. तिथे रोहितला स्वत:च नेतृत्व सिद्ध करुन दाखवावं लागेल. सध्याचा रोहितचा फॉर्मही चिंतेचा विषय आहे. पण त्यावर तो लवकरच उत्तर शोधेल अशी अपेक्षा करुया.

Why rohit sharma is successful as a captain what diffrent Quality in him know about that

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.