AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WI vs IND 1st ODI | बॅटिंगचा नंबर आला नाही, पण फिल्डिंगमध्ये Virat Kohli सुपर्ब, जिंकलस भावा, VIDEO

WI vs IND 1st ODI | Virat Kohli ने घेतलेल्या जबरदस्त कॅचचा VIDEO एकदा पाहा. विराटने बॅटिंगची कमतरता फिल्डिंगमध्ये भरुन काढली. ज्यामुळे वेस्ट इंडिजचा डाव लवकर आटोपण्यास हातभार लागला.

WI vs IND 1st ODI | बॅटिंगचा नंबर आला नाही, पण फिल्डिंगमध्ये Virat Kohli सुपर्ब, जिंकलस भावा, VIDEO
Wi vs ind 1st odi Virat kohliImage Credit source: jio cinema
| Updated on: Jul 28, 2023 | 8:53 AM
Share

बारबाडोस : टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी आतापर्यंत चांगला ठरलाय. टेस्ट सीरीजमध्ये विराट कोहलीला फक्त दोनदा बॅटिंगची संधी मिळाली. त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं. आता वनडे सीरीजला सुरुवात झालीय. इथे सुद्धा विराट आपल्या बॅटचा जलवा दाखवेल. पहिल्या वनडेमध्ये विराटला फार संधी मिळाली नाही.

चाहत्यांना विराटच्या बॅटिंगची प्रतिक्षा होती. पण विराट फलंदाजीसाठी आलाच नाही. त्याने ती कसर फिल्डिंगमध्ये भरुन काढली. त्याने जबरदस्त कॅच घेतली. ज्यामुळे वेस्ट इंडिजचा डाव लवकर आटोपण्यास हातभार लागला.

7 ओव्हर्समध्ये 7 विकेट

बारबाडोसच्या ब्रिजटाउनमध्ये गुरुवारी 27 जुलैला भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पहिला वनडे सामना झाला. या मॅचमध्ये भारतीय स्पिनर्ससमोर विंडिजचे फलंदाज हतबल दिसले. रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने मिळून 7 ओव्हर्समध्ये 7 विकेट घेतले. यात एका विकेटमध्ये विराट कोहलीच योगदान आहे.

चेंडू कव्हर्सच्या डोक्यावरुन मारण्याचा प्रयत्न

वेस्ट इंडिजच्या इनिंगमध्ये 18 व्या ओव्हरमध्ये रवींद्र जाडेजाने एक विकेट आधीच घेतला होता. याच ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर पुन्हा त्याने विकेट घेतला. क्रीजवर आलेला विंडिज फलंदाज रोमारियो शेफर्डने जाडेजाचा चेंडू कव्हर्सच्या डोक्यावरुन मारण्याचा प्रयत्न केला. पण यश मिळालं नाही. चेंडू बॅटच्या कडेला लागला. दुसऱ्या स्लीपमध्ये तैनात असलेल्या कोहलीने वेगाने झेप घेऊन एकाहाताने कॅच पकडली.

3 ओव्हरमध्ये 6 धावा देऊन 4 विकेट

जाडेजाचा या मॅचमधील हा तिसरा विकेट होता. डावखुरा स्टार स्पिनर जाडेजाने 4 ओव्हरमध्ये तीन विकेट घेतले. वेस्ट इंडिजच्या बॅटिंग ऑर्डरचा कणा मोडून काढला. वेस्ट इंडिजची टीम या धक्क्यातून शेवटपर्यंत सावरु शकली नाही. जाडेजानंतर अन्य फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याची जबाबदारी कुलदीप यादवने पार पडली. कुलदीपने 3 ओव्हरमध्ये 6 धावा देऊन 4 विकेट काढले.

कोहली बॅटिंगसाठी आलाच नाही

विडिंजचा डाव 23 ओव्हर्समध्ये 114 धावांवर आटोपला. टीम इंडियाने 22.5 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून हे लक्ष्य गाठलं. कोहली या मॅचमध्ये बॅटिंगसाठी उतरलाच नाही.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.