IND vs WI : संघ जाहीर होताच आता प्लेइंग 11 ची चर्चा, टीम इंडिया पहिल्या सामन्यात या खेळाडूंसोबत उतरणार!
IND vs WI 1st Test Playing 11: वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. आता कर्णधार शुबमन गिल पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियात कुणाला संधी देणार? भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असणार? जाणून घ्या.

टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेनंतर मायदेशात परतल्यावर कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडियासमोर कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचं आव्हान असणार आहे. उभयसंघात 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या मालिकेसाठी गुरुवारी भारतीय संघाची घोषणा केली. या मालिकेत शुबमन गिल नेतृत्व करणार आहे. तर अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा याला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. नियमित विकेटकीपर आणि उपकर्णधार ऋषभ पंत याला पायाच्या दुखापतमुळे या मालिकेला मुकावं लागलंय. त्यामुळे रवींद्र जडेजाला उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आता संघ जाहीर झाल्यानंतर पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
पहिला सामना कुठे?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील सलामीचा सामना 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही जोडी ओपनिंग करु शकते. साई सुदर्शन तिसर्या स्थानी बॅटिंगसाठी येऊ शकतो. साईने इंग्लंड दौऱ्यात कसोटी पदार्पण केलं होतं. तसेच निवड समिताने इंग्लंड दौऱ्यात निराशा करणाऱ्या करुण नायर याला विंडीज विरूद्धच्या मालिकेतून डच्चू दिला. त्यामुळे करुणच्या जागी आता प्लेइंग ईलेव्हनमध्ये देवदत्त पडीक्कल याचा समावेश केला जाऊ शकतो. देवदत्तने ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या पहिल्या अनऑफीशियल टेस्ट मॅचमध्ये शतक ठोकलं होतं.
ऋषभ पंत याच्या जागी या मालिकेत ध्रुव जुरेलला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ध्रुववर विकेटकीपिंगसह बॅटिंग अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे. तसेच या मालिकेतून ऑलराउंडर अक्षर पटेल याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे लोकल बॉयला अहमदाबादमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते.
तसेच उपकर्णधार म्हटल्यावर रवींद्र जडेजा खेळणार हे वेगळ सांगण्याची गरज नाही. तर वॉशिंग्टन सुंदर याचा समावेश केला जाऊ शकतो. तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या जोडीवर असणार आहे.
पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज.
