Shamar Joseph चा जोरदार पंच, दक्षिण आफ्रिके विरुद्ध 5 विकेट्स

Shamar Joseph 5 Wickets: वेस्ट इंडिज क्रिकेट टीमचा युवा गोलंदाज शामर जोसेफ याने दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत.

Shamar Joseph चा जोरदार पंच, दक्षिण आफ्रिके विरुद्ध 5 विकेट्स
shamar joseph 5 wickets
Follow us
| Updated on: Aug 15, 2024 | 11:37 PM

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. हा सामना गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची दुरावस्था झाली आहे. वेस्ट इंडिजच्या धारदार बॉलिंगसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले आहेत. शामर जोसेफ याने आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला जोरदार पंच दिला आहे. शामर जोसेफ याने दक्षिण आफ्रिकेला नववा झटका देत पाच विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेवर पहिल्याच दिवशी दुसर्‍या सत्रातच ऑलआऊट होण्याची स्थिती ओढावली आहे.

शामर जोसेफचा पंच

शामर जोसेफने काइल वेरेन याला 21 धावांवर बोल्ड करत 5 विकेट्स पूर्ण केल्या. त्याआधी शामर जोसेफने अनुक्रमे एडन मारक्रम, कॅप्टन टेम्बा बावुमा, डेव्हिड बेडिंगहॅम आणि केशव महाराज या चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. शामरने या 5 पैकी 3 विकेट्स या फलंदाजांना बोल्ड करुन मिळवल्या. इतकंच काय तर शामरने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याला खातंही उघडून दिलं नाही. शामरने  टेम्बावा डक आऊट केला. जोसेफची कसोटी कारकीर्दीत 5 विकेट्स घेण्याची ही एकूण तिसरी तर दक्षिण आफ्रिके विरुद्धची पहिली वेळ ठरली आहे. शामरने याआधी सलग 2 वेळा ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष बाब म्हणजे शामरने अवघ्या 10 व्या डावात ही कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं जात आहे.

शामर जोसेफची 5 विकेट्स घेण्याची तिसरी वेळ

वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकाईल लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, जोमेल वॉरिकन, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, डेन पिएड, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.