WI vs SA: शेवटच्या जोडीने लाज राखली, साऊथ आफ्रिकेचं 160वर पॅकअप, शामरचा ‘पंजा’

West indies vs South Africa 2nd Test 1st Innings Highlights: नांद्रे बर्गर आणि डेन पिएड या जोडीने दहाव्या विकेटसाठी केलेल्याअर्धशतकी भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेला 100 पार पोहचता आलं.

WI vs SA: शेवटच्या जोडीने लाज राखली, साऊथ आफ्रिकेचं 160वर पॅकअप, शामरचा 'पंजा'
shamar joesph vs south africa
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 1:52 AM

दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्या कसोटीतील पहिला डाव हा 160 धावांवर आटोपला आहे. दक्षिण आफ्रिकेने 54 ओव्हरमध्ये 160 धावा केल्या पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने यजमान विंडिजच्या धारदार बॉलिंगसमोर गुडघेच टेकले. शामर जोसफे याने 5 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला बॅकफुटवर ढकलण्यात मोठी भूमिका बजावली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 9 बाद 97 अशी स्थिती झाली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिका 100 धावा तरी करणार की नाही? असा प्रश्न दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग पाहून उपस्थित करण्यात येत होता. मात्र शेवटच्या जोडीने दक्षिण आफ्रिकेची लाज राखली. शेवटच्या जोडीने केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेला 160 धावांपर्यंत पोहचता आलं.

10 व्या विकेटसाठी 63 रन्सची पार्टनरशीप

दक्षिण आफ्रिकेची 9 बाद 97 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर नांद्रे बर्गर आणि डेन पिएड या जोडीने दक्षिण आफ्रिकेची लाज राखली. या दोघांनी 63 धावांची भागीदारी केली. त्यानंतर नांद्रे बर्गर आऊट झाला आणि दक्षिण आफ्रिकेचा डाव आटोपला. नांद्रे बर्गर याने 56 बॉलमध्ये 23 धावांची झुंजार खेळी केली. तर डेन पिएड याने टीमसाठी सर्वाधिक धावा केल्या. डेन पिएडने 60 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 4 फोरसह नॉटआऊट 38 रन्स केल्या. त्या व्यतिरिक्त डेव्हिड बेडिंगहॅम याने 28, ट्रिस्टन स्टब्स 26 आणि काइल वेरेन याने 21 धावांच योगदान दिलं. तर एडन मारक्रम 14 धावा करुन माघारी परतला. चौघे आले तसेच परत गेले. यांना भोपळाही फोडता आला नाही. तर ओपनर टॉनी डी झॉर्झी 1 रन करुन मैदानाबाहेर गेला.

शामर जोसेफकडून ‘पंच’नामा

विंडिजकडून शामर जोसेफ याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. शामरची कसोटी कारकीर्दीत दक्षिण आफ्रिके विरुद्ध 5 विकेट्स घेण्याची पहिली तर एकूण तिसरी वेळ ठरली. जेडेन सील्स याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जेसन होल्डर आणि गुडाकेश मोटी या दोघांनी 1-1 विकेट घेतली. आता विंडिज आता पहिल्या डावात किती धावांची आघाडी घेते, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकाईल लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, जोमेल वॉरिकन, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, डेन पिएड, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.