AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup: पाकिस्तान VS जसप्रीत बुमराह! एक षटकार मारण्याचं आव्हान, झालं असं की…

आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पण क्रीडाप्रेमींना वेध लागले आहेत ते 14 सप्टेंबरला होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याचे.. पाकिस्तानसमोर जसप्रीत बुमराहचं आव्हान असणार आहे. एक षटकार मारणं खरंच पाकिस्तानला जमेल का?

Asia Cup: पाकिस्तान VS जसप्रीत बुमराह! एक षटकार मारण्याचं आव्हान, झालं असं की...
Asia Cup: पाकिस्तान VS जसप्रीत बुमराह! एक षटकार मारण्याचं आव्हान, झालं असं की...Image Credit source: PTI
| Updated on: Sep 08, 2025 | 3:44 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेत 14 सप्टेंबरला भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.  या सामन्यात भारताचं पारडं तसं पाहीलं तर जड आहे. दुसरीकडे जसप्रीत बुमराहचं तगडं आव्हान असणार आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण जसप्रीत बुमराहचं आव्हान पेलणं आतापर्यंत पाकिस्तान संघाला काही जमलं नाही. टी20 क्रिकेट आंतरराष्ट्रीय सामन्यात आतापर्यंत बुमराहचा सामना करताना पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे पाय लटपटत असल्याचं दिसून आलं आहे. तसं पाहीलं तर क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. काही विक्रम मोडीत निघतात, काही रचले जातात. पण जसप्रीत बुमराहचं आव्हान पेलणं आतापर्यंत तरी पाकिस्तानला शक्य झालेलं नाही. म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. तर त्याचं उत्तर आहे षटकार… जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानी फलंदाजांना जमलेलं नाही. त्याला आतापर्यंत एकही षटकार पडलेला नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला की विकेट वाचवणं हीच प्राथमिकता असल्याचं दिसून आलं आहे.

आशिया कप स्पर्धा टी20 फॉर्मेटमध्ये खेळली जाणार आहे. जसप्रीत बुमराहने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 391 चेंडू टाकले आहेत. पण यापैकी एकाही चेंडूवर षटकार मारलेला नाही. जसप्रीत बुमराह जेव्हा जेव्हा गोलंदाजीला समोर उभा ठाकला तेव्हा पाकिस्तानी संघाला षटकार मारणं काही जमलं नाही. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत हे आव्हान पाकिस्तानी खेळाडूंसमोर असणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचे फलंदाज जसप्रीत बुमराहच्या 24 चेंडूवर षटकार मारणार का? हा प्रश्न आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचं लक्ष याकडे लागून असणार आहे.

आशिया कप स्पर्धेच्या प्लेइंग 11 मध्ये जसप्रीत बुमराह खेळणार हे निश्चित आहे. चार षटकं टाकणं ही काय बुमराहसाठी मोठी गोष्ट नाही. त्यात जसप्रीत बुमराह संघात असणं टीम इंडियासाठी चांगलं आहे. कारण यामुळे आशिया कप जिंकण्यांची संधी आणखी वाढते. जसप्रीत बुमराह प्लेइंग 11 मध्ये असताना भारताने एकही सामना गमावलेला नाही. बुमराह आतापर्यंत 12 सामने खेळला असून प्रत्येक सामन्यात त्यानेविकेट काढली आहे. किमान एक विकेट तरी घेतलीच आहे.

Follow Us
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!
आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख....
Washim : आनंदाचा शिधा घेण्यासाठी महिलांची तुफान गर्दी; खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर मोठी झुंबड
दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर....
Mumbai Air Pollution : दिवाळीच्या फटाक्यांनी मुंबईची हवा बिघडवली; BKC मध्ये AQI 170 वर, निर्बंध झुगारून आतषबाजी सुरूच
युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ....
Shinde Group Vs BJP : युतीतच डावललं जात असेल तर फायदा काय? शिंदे गटाच्या नेत्यांची एकनाथ शिंदेंकडे भाजपविरोधात तक्रार, नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने
Rahul Gandhi : E20 Petrol : E20 पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण 30 टक्क्यांपार? कर्नाटकच्या अहवालाने खळबळ; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे..
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचं ते वक्तव्य; रुपाली ठोंबरे पाटील काय म्हणाल्या?
निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ
Thane Diwali Pahat : Meenakshi Shinde : निमंत्रण असूनही आशिष म्हात्रेंची मीनाक्षी शिंदेंच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे पाठ; नेमकं कारण काय?
आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज
Sharad Pawar Health Update : आत्ताच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी; शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, तर....
रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत.....
Lawrence Bishnoi Gang : रणवीर सिंगकडे 20 कोटींची खंडणी मागणारा हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टीच्या टीमलाही....
मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर राऊतांचा थेट
Sanjay Raut : मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष का फोडला? मोदींच्या विधानावर संजय राऊतांचा थेट सवाल; 36 खासदारांचा आकडाही सांगितला