AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 स्पर्धेपूर्वी सनरायझर्स हैदराबाद हेनरिक क्लासेनला रिलीज करणार? असं का ते समजून घ्या

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. खेळाडूंसाठी ट्रेड विंडो ओपन आहे. पण खेळाडूंच्या स्वॅपिंगबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मिनी लिलाव डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे. तत्पूर्वी काही खेळाडूंना रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे.

IPL 2026 स्पर्धेपूर्वी सनरायझर्स हैदराबाद हेनरिक क्लासेनला रिलीज करणार? असं का ते समजून घ्या
IPL 2026 स्पर्धेपूर्वी सनरायझर्स हैदराबाद हेनरिक क्लासेनला रिलीज करणार? असं का ते समजून घ्याImage Credit source: PTI
| Updated on: Nov 06, 2025 | 11:00 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या मिनी लिलावाची तारीख जवळ येत आहे. डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मिनी लिलाव पार पडणार आहे. तत्पूर्वी खेळाडूंची ट्रेड विंडोच्या माध्यमातून खरेदी विक्री करता येणार आहे. दुसरीकडे, फ्रेंचायझींना राखून ठेवलेल्या आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. असं असताना या मिनी लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबाद एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. रिलीज करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हेनरिक क्लासेनचं नाव असण्याची शक्यता आहे. मिनी-लिलावापूर्वी सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझी त्यांचा स्टार खेळाडू हेनरिक क्लासेनला रिलीज करेल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. तर त्याला रिलीज करण्यामागे सनरायझर्स हैदराबादचं एक गणित असल्याचं बोललं जात आहे.

सनरायझर्स हैदराबाद फ्रेंचायझी हेनरिक क्लासेनसाठी 23 कोटी रुपयांची किंमत मोजत आहे. त्यामुळे मिनी लिलावापूर्वी त्याला रिलीज केलं तर पर्समध्ये 23 कोटींची रक्कम जमा होईल. त्याचा फायदा त्यांना मिनी लिलावात चांगले खेळाडू घेण्यासाठी होऊ शकतो. हेनरिक क्लासेनसह काही 10 कोटींच्या किंमतीतील खेळाडूंना रिलीज केलं तर सनरायझर्स हैदराबादकडे 40 कोटींहून अधिक रक्कम असेल. त्यामुळे मिनी लिलावात हव्या असलेल्या खेळाडूसाठी चांगली बोली लावून घेता येईल.

दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने हेनरिक क्लासेनला परत खरेदी करण्याची योजना देखील आखल्याचं बोललं जात आहे. कारण इतर फ्रेंचायझी त्याला मोठी रक्कम देण्यास टाळाटाळ करतील. त्याचा फायदा सनरायझर्स हैदराबादला होऊ शकतो. सनरायझर्स हैदराबाद त्याला पुन्हा 15 ते 20 रुपये खर्च करून संघात घेऊ शकतात. सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने उर्वरित रकमेतून इतर स्टार खेळाडू खरेदी करण्याची योजना आखली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आयपीएल 2026 च्या मिनी-लिलावात हेनरिक क्लासेनचे नाव आलं तर आश्चर्य वाटायला नको.

सनरायझर्स हैदराबादर मोहम्मद शमी आणि हर्षल पटेल यांना रिलीज करू शकते. कारण मागच्या वर्षी मोहम्मद शमीच्या फिटनेसची समस्या होती. मात्र यंदा तो फिट असून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत आहे. तर हर्षल पटेलने मागच्या पर्वातील 13 सामन्यात 16 विकेट घेतल्या. पण खूपच महागडा ठरला होता.

चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.