Women Cricketers: तिने तिच्याशीच बांधली लगीन गाठ; 5 महिला क्रिेकटर्स ज्यांनी महिलांशी केलं लग्न; या यादीत अजून नवीन नाव जोडलं
पलाश मुच्छल आणि भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना यांच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान क्रिकेट विश्वातील या पाच हटके जोड्यांविषयी अनेकांना माहितीच नाही. या महिला क्रिकेटर्सनी तिचा जीवनसाथी म्हणून महिलेचीच निवड केली आहे. मैत्रिणीच आयुष्यभरासाठी विवाह बंधनात अडकल्या आहेत.

सध्या समलैंगिक लग्नाला अल्प प्रतिसाद असला तरी समाजाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडाबहूत बदलला आहे. क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज महिला खेळाडूंनी सुद्धा समलैंगिक विवाह केला आहे. या यादीत अजून एक नाव जोडल्या गेले आहे. दक्षिण आफ्रिकेची ऑलराऊंडर क्लो ट्रायोन या महिला खेळाडूने तिची मैत्रिण मिशेल नेटिवल हिच्याशी साखरपुड्याची घोषणा केली. अर्थात असे नातं जाहीर करणाऱ्या ती काही क्रिकेट विश्वातील एकमेव महिला खेळाडू नाही. तर या यादीत अगोदरच काही महिला खेळाडू आहेत.
ॲलेक्स ब्लॅकवेल-लिंडसे आस्क्यू
ऑस्ट्रेलियाची ॲलेक्स ब्लॅकवेल आणि इंग्लंडची लिंडसे आस्क्यू यांनी 2015 मध्ये लग्न केले होते. दोघी एकमेकांना 8 वर्षांपासून डेट करत होत्या. दोघांनी 2023 मध्ये समलैंगिक असल्याचे जाहीर केले होते. या दोघींनी त्यांच्या देशाचे क्रिकेट मैदानावर प्रतिनिधीत्व केले. ब्लॅकवेल ऑस्ट्रेलियासाठी 252 आंतरराष्ट्रीय सामने खेळली तर आस्क्यू 14 जागतिक सामने खेळली. ब्लॅकवेल काही काळ ऑस्ट्रेलियाची कर्णधार सुद्धा होती.
एमी सॅटर्थवेट आणि ली ताहुहु
न्युझीलँडची एमी सॅटर्थवेट आणि ली ताहुहू या दोघींनी 2017 मध्ये लग्न केले होते. त्यांचे नाते घनिष्ठ होते. सॅटर्थवेट ही एक डावखुरी फलंदाज आहे. तर ताहुहू ही उत्कृष्ट गोलंदाज आहे. या दोघांना एक मुलगी आहे. ज्याचे नाव ग्रॅस मॅरी सॅटर्थवेट आहे. या मुलीचा जन्म 13 जानेवारी 2020 रोजी झाला होता.
डेन व्हॅन नीकर्क- मॅरिजॅन कप्प
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डॅन वॅन नीकर्क आणि स्टार ऑलराऊंडर मॅरिजॅन कप्प हे कित्येक वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होत्या. 2018 मध्ये दोघींनी लग्न केले. नीकर्क ही फलंदाज तर फिरकीपटू आहे. तिने जवळपास 200 जागतिक सामने खेळले आहे. तर कप्प ही जोरदार फलंदाज आणि फिरकीपटू आहे. दोघींनी एकमेकींना प्रेमाच्या फिरकीत गारद केले आहे. कप्पने 200 जागतिक सामने खेळले आहे.
मेगन शुट्ट-जेस होलिओक
ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगन शुट्ट हिने 2019 मध्ये जेस होलिओक हिच्यासोबत लगीन गाठ बांधली. त्या दीर्घकाळापासून एकमेकींच्या संपर्कात होत्या. शुट्ट हिने 2012 मध्ये जागतिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तिने जवळपास 150 सामन्यात जोरदार कामगिरी बजावली. तर होलिओक ही क्रिकेटर नाही तर ऑस्ट्रेलियात फॅसिलिटी मॅनेजर म्हणून काम पाहते. त्यांना ऑगस्ट 2021 मध्ये लुईस नावाची कन्या झाली.
नताली सायवर- कॅथरीन ब्रंट
या यादीत इंग्लंडची स्टार ऑलराऊंडर नताली सायवर आणि कॅथरीन ब्रंट यांचेही नाव आहे. या दोघी पाच वर्षांपासून नात्यात होत्या. 29 मे 2022 रोजी दोघींनी लग्न केले. कोविडमुळे त्यांचे लग्न बरेच वर्षे पुढे सरकले. त्यांना 2017 मध्येच लग्न करायचे होते. पण क्रिकेटचे सामने आणि नंतर आलेल्या कोविडमुळे ही जोडी पाच वर्षांनी लग्न बंधनात अडकली.
