AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens T20 WC 2024: न्यूझीलंड-दक्षिण अफ्रिका अंतिम सामना, जाणून घ्या हेड-टू-हेड आकडेवारी

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या नवव्या पर्वात नवा विजेता मिळणार आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका या संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. या दोन्ही संघानी एकदाही जेतेपद मिळवलेलं नाही. त्यामुळे जेतेपदाबाबत प्रचंड उत्सुकता वाढली आहे. कोण बाजी मारणार? याची चर्चा सुरु आहे. असं असताना कोणता संघ आतापर्यंत वरचढ ठरला ते जाणून घेऊयात

Womens T20 WC 2024:  न्यूझीलंड-दक्षिण अफ्रिका अंतिम सामना, जाणून घ्या हेड-टू-हेड आकडेवारी
Image Credit source: ICC
| Updated on: Oct 19, 2024 | 8:26 PM
Share

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत 18 दिवसांच्या तीव्र स्पर्धेनंतर नवा विजेता मिळणार आहे. 20 ऑक्टोबरला दुबई आंतरराष्ट्रीय मैदानात अंतिम फेरीचा सामना पार पडणार आहे.वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही संघांना पहिलं जेतेपद मिळवण्याची संधी आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. न्यूझीलंडने उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. तर दक्षिण अफ्रिकेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजून अंतिम सामन्याची पायरी चढली आहे. वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या आतापर्यंत आठ पर्वात हे दोन्ही 16 वेळा आमनेसामने आले आहेत. यात न्यूझीलंडचं पारडं जड असल्याचं दिसून आलं आहे.न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला 11 वेळा पराभवाची धूळ चारली आहे. तर दक्षिण अफ्रिकेने 4 वेळा विजय मिळवला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये या दोन्ही संघातील एक सामना निकालाविना संपला. वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिका संघ न्यूझीलंडविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करून दोनदा, तर धावांचा पाठलाग करून 2 वेळा जिंकला आहे. तर न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना 5 वेळा, तर धावांचा पाठलाग करताना 6 वेळा जिंकला आहे. त्यामुळे तसं पाहिलं तर न्यूझीलंडचं पारडं जड आहे.

दोन्ही संघांचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास

दक्षिण अफ्रिकेने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजला 10 विकेट आणि 13 चेंडू राखून पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडकडून 7 विकेटने पराभव झाला. तिसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने स्कॉटलंडचा 80 धावांनी धुव्वा उडवला. चौथ्या सामन्यात बांगलादेशला 7 विकेट राखून पराभूत केलं. तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट आणि 16 चेंडू राखून पराभव केला.

न्यूझीलंडने साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात भारताचा 58 धावांनी पराभव केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून 60 धावांनी पराभूत व्हावं लागलं. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंड 8 विकेट राखून, तर चौथ्या सामन्यात पाकिस्तानला 54 धावांनी पराभूत केलं. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर फक्त 8 धावांनी विजय मिळवला.

दोन्ही संघाचे खेळाडू

दक्षिण आफ्रिका महिला संघ: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, ॲनेके बॉश, क्लो ट्रायॉन, मारिझान कॅप, सुने लुस, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका, तुमी सेखुखुने , सेश्नी नायडू, मायके दी रिडर

न्यूझीलंड महिला संघ: सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), रोझमेरी मायर, ली ताहुहू, ईडन कार्सन, फ्रॅन जोनास, मॉली पेनफोल्ड, जेस केर, हॅना रोवे, लेह कॅस्परेक.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.