AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens World Cup: ऑस्ट्रेलिया की दक्षिण आफ्रिका! उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणाशी? जाणून घ्या गणित

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडला 53 धावांनी पराभूत केलं आणि उपांत्य फेरी गाठली. आता भारताचा उपांत्य फेरीत कोणाशी सामना होणार याबाबत उत्सुकता आहे. ऑस्ट्रेलिया की दक्षिण अफ्रिका याबाबत पेच आहे.

Womens World Cup: ऑस्ट्रेलिया की दक्षिण आफ्रिका! उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणाशी? जाणून घ्या गणित
Womens World Cup: ऑस्ट्रेलिया की दक्षिण आफ्रिका! उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणाशी? जाणून घ्या गणितImage Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Oct 24, 2025 | 7:47 PM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सुरुवातीचे दोन सामने जिंकून भारताने चांगली सुरुवात केली होती. पण त्यानंतर सलग तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने पराभूत केलं होतं. सलग तीन सामन्यात पराभव झाल्याने उपांत्य फेरीचं गणित गडबडलं होतं. पण भारताने न्यूझीलंडला 53 धावांनी पराभूत केलं आणि उपांत्य फेरीत जागा पक्की केली. उपांत्य फेरीत भारतासोबत ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंड या संघांनी धडक मारली आहे. या तिन्ही संघांनी साखळी फेरीत भारताला पराभूत केलं आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. उपांत्य फेरीत कोणासोबत सामना करावा लागतो याची गणित बांधत आहेत. भारताचा उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिकेशी होऊ शकतो. कारण भारताने बांगलादेशविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तरी चौथ्या स्थानात काही फरक पडणार नाही.

दुसरीकडे, इंग्लंडने न्यूझीलंडविरूद्धचा शेवटचा सामना जिंकला तर जास्तीत जास्त दुसऱ्या स्थानावर मजल मारू शकतात. इंग्लंडचे 9 गुण असून शेवटचा सामना जिंकला तर 11 गुण होतील. पण ऑस्ट्रेलियाचे आताच 11 गुण, तर दक्षिण अफ्रिकेचे 10 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाला 13 गुण तर दक्षिण अफ्रिकेला 12 गुण करण्याची संधी आहे. त्यामुळे भारताचा सामना टॉपला असलेल्या संघाशी होणार आहे. या स्थानावर ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण अफ्रिका विराजमान होऊ शकते. या दोन पैकी एका संघाशी भारताचा सामना होईल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात साखळी फेरीतील शेवटचा सामना होत आहे. या सामन्यातील विजयी संघ भारताची भिडेल.

उपांत्य फेरीचा सामना खेळण्यापूर्वी भारताला चाचपणी करण्याची एक संधी साखळी फेरीत असणार आहे. भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला काही गोष्टी सुधारण्याची संधी मिळणार आहे. खासकरून गोलंदाजीत भारताला काम करावं लागणार आहे. कारण या स्पर्धेत भारताची गोलंदाजी फार काही प्रभावी दिसली नाही. दुसरीकडे, उपांत्य फेरीतील पहिला सामना 29 सप्टेंबरला गुवाहाटी क्रिकेट स्टेडियमवर, तर दुसरा सामना 30 सप्टेंबरला डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीत खेळला जाईल.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...