Team India : हे होणारचं होतं, टीम इंडियाला सलग दुसऱ्या पराभवानंतर मोठा झटका, वर्ल्ड कप दरम्यान काय झालं?
Icc Womens World Cup 2025 : यजमान टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पराभवानंतर आणखी एक मोठा झटका लागला आहे. आयसीसीने टीम इंडियावर कारवाईचा चाबूक फिरवला आहे.

हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत धमाकेदार सुरुवात केली. मात्र सलग 2 विजयानंतर टीम इंडिया विजयी ट्रॅकवरुन घसरली. भारताने श्रीलंका आणि पाकिस्तान या 2 आशियाई संघांना पराभूत करत सलग 2 विजय मिळवले. मात्र त्यानंतर भारताला दक्षिण आफ्रिका आणि गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडिया विरुद्ध वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवला. तर ऑस्ट्रेलियाचा टीम इंडिया विरुद्धचा वर्ल्ड कपमधील 11 विजय ठरला. भारताला ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या या पराभवानंतर मोठा झटका लागला आहे.
ऑस्ट्रेलियाने रविवारी 12 ऑक्टोबरला भारतावर 3 विकेट्सने मात केली. या सामन्यात टीम इंडियाकडून एक मोठी चूक झाली. त्यानंतर टीम इंडियावर आयसीसी कारवाई करणार हे निश्चित होतं. त्यानुसार आयसीसीने 2 दिवसानंतर टीम इंडियाला झटका दिला आहे.
टीम इंडियावर आयसीसीकडून कारवाईचा चाबूक
टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात नियमाचं उल्लंघन झालं. टीम इंडियाने निर्धारित वेळेत 1 ओव्हर कमी टाकली. त्यामुळे आयसीसीकडून टीम इंडियावर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई करण्यात आली आहे. टीम इंडियाकडून आयसीसीच्या 2.22 चं उल्लंघन झालं. आयसीसीच्या 2.22 या आर्टिकलमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी कारवाईची तरतूद आहे. त्यानुसार एका ओव्हरसाठी सामन्याच्या मानधनापैकी 5 टक्के रक्कम अशी दंडाची तरतूद आहे. टीम इंडियाने निर्धारित वेळेत 1 ओव्हर कमी टाकली. त्यामुळे सामन्याच्या एकूण मानधनापैकी 5 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावा लागणार आहे. कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने आपली चूक मान्य केली. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही. आयसीसीने याबाबतची माहिती एक्स प्लॅटफॉर्मवरुन प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
आयसीसीकडून महिला ब्रिगेडला दंड
India have been fined for slow over-rate during their game against Australia at #CWC25.
Details ⬇️https://t.co/qp2hmAzB3i
— ICC (@ICC) October 15, 2025
ऑस्ट्रेलिया विरुद्ध 330 धावा करुन पराभव
टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध 330 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं होतं. स्मृती मंधाना 80 आणि प्रतिका रावल हीच्या 75 धावांच्या मदतीने 330 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र ऑस्ट्रेलियाने 49 ओव्हरमध्ये 3 विकेट्सने हा सामाना जिंकला.
टीम इंडियाचा चौथा सामना केव्हा?
दरम्यान टीम इंडिया या मोहिमेतील आपला चौथा सामना हा रविवारी 19 ऑक्टोबरला खेळणार आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात इंग्लंडचं आव्हान असणार आहे. भारतासमोर या सामन्यात पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचं आव्हान असणार आहे.
