World Cup 2023 | वर्ल्ड कपसाठी ऐनवेळेस आर अश्विन याची टीम इंडियात एन्ट्री, फायनल संघ जाहीर
R. Ashwin in World Cup Squad 2023 : वर्ल्ड कप भारतामध्ये होणार असल्याने आर. अश्विन याने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटच्या अनुभवाचा फायदा संघाला होणार आहे.

मुंबई : आगामी वर्ल्डकप 2023 साठी संघाची घोषणा केल्यानंतर त्यामध्ये काही बदल करायचा असेल तर त्यासाठी आज अखेरचा दिवस होता. आशिया कपमध्ये झालेल्या दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या अक्षर पटेल याच्या जागी आर अश्विन याचं संघात निवड करण्यात आली आहे. वर्ल्ड कप भारतामध्ये होणार असल्याने आर. अश्विन याने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटच्या अनुभवाचा फायदा संघाला होणार आहे.
आर अश्विन याची ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी संघात निवड करण्यात आली होती. अश्विनने दोन सामन्यांमध्ये चार विकेट प्रभावी कामगिरी करत निवड समितीचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. अक्षर पटेल याला आशिया कपममध्ये झालेल्या दुखापतीमुळे तो बाहेर पडला होता. भारताने वर्ल्ड कपसाठी जाहीर केलेल्या संघामध्ये एका ऑफ स्पिनरची कमी होती. आर अश्विनेच्या संघात येण्याने ती एका जागा भरून निघणार आहे. भारतामध्ये 45 दिवस चालणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये खेळपट्टी खराब झाल्यावर तिथे अश्विन उपयुक्त ठरू शकतो.
🚨 BREAKING: India make late change to #CWC23 squad with all-rounder set to miss out due to injury!
Details 👇https://t.co/oa6htByQmz
— ICC (@ICC) September 28, 2023
भारताचा वर्ल्ड कपसाठी संघ :-
रोहित शर्मा (C), हार्दिक पांड्या (VC), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन इशान किशन, सूर्यकुमार यादव.
