AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2024, DC vs UPW : दिल्ली कॅपिटल्सचा युपी वॉरियर्सवर दणदणीत विजय, मेग आणि शफालीची अर्धशतकी खेळी

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने युपी वॉरियर्स संघाचा दारुण पराभव केला. विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान फक्त एक गडी गमवून पूर्ण केलं. यामुळे दिल्लीला पॉइंट टेबलमध्ये फायदा झाला आहे. तर युपीचं नुकसान झालं आहे.

WPL 2024, DC vs UPW : दिल्ली कॅपिटल्सचा युपी वॉरियर्सवर दणदणीत विजय, मेग आणि शफालीची अर्धशतकी खेळी
WPL 2024, DC vs UPW : शफाली वर्मा आणि मेन लॅनिंगच्या वादळापुढे युपी वॉरियर्स गारद
| Updated on: Feb 26, 2024 | 10:31 PM
Share

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने युपी वॉरियर्स संघाचा पराभव केला. नाणेफेकीचा कौल जिंकत दिल्लीने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच फलंदाजीसाठी आलेल्या युपी वॉरियर्सच्या खेळाडूंना डोकं वर काढून दिलं नाही. त्यामुळे युपी वॉरियर्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. युपी वॉरियर्सकडू एलिसा हिली आणि वृंदा दिनेश ही जोडी मैदानात उतरली खऱी, पण तिसऱ्या षटकापासून जी घसरण लागली ती थांबलीच नाही. श्वेता सेहरावत वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. श्वेताने केलेल्या 45 धावांच्या जोरावर दिल्लीसमोर विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दिल्लीने सहज गाठलं. सलामीला आलेल्या मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा या जोडीने युपी वॉरियर्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. दोघांनी अर्धशतकं झळकावली. तसेच अवघ्या 14.3 षटकात दिलेले आव्हान गाठलं. या विजयासह दिल्लीने आपलं विजयी घोडदौड सुरु केली आहे. तर युपी वॉरियर्सच्या पदरात दुसऱ्यांदा निराशा पडली आहे.

मेग लॅनिंग आणि शफाली वर्मा या जोडीने पहिल्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. अवघी एक धाव आवश्यक असताना एक्सलस्टोनच्या गोलंदाजीवर मेग लॅनिंग बाद झाली. त्यानंतर आलेल्या जेमिमा रॉड्रिग्सने चौकार ठोकत विजय मिळवून दिला. मेग लॅनिंगने 43 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. तर शफाली वर्माने 43 चेंडूत आक्रमक खेळी करत 64 धावा केल्या. याता 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. शफाली शेवटपर्यंत नाबाद राहिली. खऱ्या अर्थाने शफालीने लेडी सेहवाग असल्याचं आपल्या फलंदाजीतून दाखवून दिलं.

युपी वॉरियर्सचा पुढचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. मुंबईने या स्पर्धेत दोन पैकी दौन सामने जिंकले आहेत. तर युपीच्या पदरात दोन्ही वेळा निराशा पडली आहे. आता युपी आणि मुंबईचा सामना 28 फेब्रुवारीला होणार आहे. तर दिल्लीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी 29 तारखेला भिडणार आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), वृंदा दिनेश, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, पूनम खेमनार, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, गौहर सुलताना.

दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, ॲनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.