WPL 2024, UPW vs GG : युपी वॉरियर्सने टॉस जिंकत घेतली गोलंदाजी, अशी असेल प्लेइंग इलेव्हन

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील आठवा सामना युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात होत आहे. युपीने स्पर्धेत तीनपैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर गुजरातला आपल्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. दरम्यान युपी वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे.

WPL 2024, UPW vs GG : युपी वॉरियर्सने टॉस जिंकत घेतली गोलंदाजी, अशी असेल प्लेइंग इलेव्हन
WPL 2024, UPW vs GG : युपी वॉरियर्सने निवडली गोलंदाजी, गुजरातला पहिल्या विजयाची प्रतिक्षा
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 7:09 PM

मुंबई : वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत आठवा सामना युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स या संघात होत आहे. दोन्ही संघांसाठी हा विजय महत्त्वाचा आहे. युपी वॉरियर्सने तीन सामने खेळले असून एका सामन्यात विजय मिळवला आहे. तर गुजरात जायंट्सला आपलं खातंही खोलता आलेलं नाही. त्यामुळे गुजरातला आपल्या पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. गुजरातने हा सामना गमवल्यास स्पर्धेतील आव्हान डळमळीत होईल. या स्पर्धेच्या पहिल्या पर्वात हे दोन्ही संघ दोन वेळा आमनेसामने आले होते. दोन्ही वेळेस युपी वॉरियर्सने गुजरात जायंट्सला पराभवाची धूळ चारली होती. युपी वॉरियर्सची कर्णधार एलिसा हिली म्हणाली की, “आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करू. ते सर्व एकसारखे खेळले आहेत. पण पाठलाग करणे संघांसाठी अधिक आरामदायक दिसते. मागच्या सामन्यासारखंच घडेल.तीच ब्लूप्रिंट घेऊन आम्ही खेळणार आहोत. ताहलिया मॅकग्रा ऐवजी संघात चमारी येते.”

गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मूनी म्हणाली की, ‘आम्ही पहिल्यांदा फलंदाजी करताना बोर्डवर 190 धावा ठेवू शकलो तर छान होईल. आमच्या संघात दोन बदल आहेत. ताहुहू ऐवजी संघात लॉरा वोल्वार्ड आणि वेदहीची जागा मन्नत कश्यप घेणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण गेम जिंकू शकतो असे तुम्हाला वाटले पाहिजे. ही स्पर्धा काही मार्गांनी लांबलचक आहे आणि इतर बाबतीत लहान आहे, आशा आहे की आज रात्री आम्हाला विजय मिळेल.’

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): हरलीन देओल, बेथ मूनी (कर्णधार/विकेटकीपर), फोबी लिचफील्ड, लॉरा वोल्वार्ड, ॲश्ले गार्डनर, दयालन हेमलता, कॅथरीन ब्राइस, स्नेह राणा, तनुजा कंवर, मन्नत कश्यप, मेघना सिंग.

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): अलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, श्वेता सेहरावत, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड.

Non Stop LIVE Update
आधी जीवेमारण्याची धमकी आता गोळीबार, सलमान खानच्या घराबाहेर काय घडलं?
आधी जीवेमारण्याची धमकी आता गोळीबार, सलमान खानच्या घराबाहेर काय घडलं?.
प्रचार तापला...टांगा पलटीवरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन्...
प्रचार तापला...टांगा पलटीवरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन्....
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण.
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी.
धाराशिवच्या पाटलांना अजितदादांनीच भाजपात पाठवलं? आधी पोस्टचा वाद आता..
धाराशिवच्या पाटलांना अजितदादांनीच भाजपात पाठवलं? आधी पोस्टचा वाद आता...
मुंबईतील जागेचा तिढा, वर्षा गायकवाड थेट दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण
मुंबईतील जागेचा तिढा, वर्षा गायकवाड थेट दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण.
शरद पवार यांच्या 'त्या' विधानावर सुनेत्रा पवार भावूक
शरद पवार यांच्या 'त्या' विधानावर सुनेत्रा पवार भावूक.
गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका; राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना तंबी
गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका; राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना तंबी.
कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, राज ठाकरेंचा राऊतांना टोला
कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, राज ठाकरेंचा राऊतांना टोला.
पंकजा मुंडे यांना बीड कठिण?; संजय राऊत यांच्या 'त्या' विधानाने खळबळ
पंकजा मुंडे यांना बीड कठिण?; संजय राऊत यांच्या 'त्या' विधानाने खळबळ.