AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2025, RCB vs GG : नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने, कर्णधार स्मृती मंधाना म्हणाली..

वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेच्या पर्वाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्याने सुरुवात झाली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गुजरात जायंट्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबी कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेकीनंतर आपलं मत व्यक्त केलं आहे.

WPL 2025, RCB vs GG : नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने, कर्णधार स्मृती मंधाना म्हणाली..
| Updated on: Feb 14, 2025 | 8:19 PM
Share

वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स या सामन्याने सुरुवात झाली आहे. हे वुमन्स प्रीमियर लीगचं तिसरं पर्व आहे. पहिल्या पर्वात मुंबई इंडियन्सने बाजी मारली होती. दुसऱ्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विजयी ठरली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु गतविजेता असून यंदा त्यांना आपलं जेतेपद शाबूत ठेवण्याचं आव्हान आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल आरसीबीच्या बाजूने लागला कर्णधार स्मृती मंधानाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दव फॅक्टर आणि खेळपट्टीचा अंदाज घेऊन स्मृती मंधानाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  आव्हानाचा पाठलाग करणं सोपं जाईल, असं स्मृती मंधाना म्हणाली.

‘बडोद्यात परतणे चांगले आहे. आम्ही एक महिना आधी इथे होतो. मला वाटले होते की ते गुजरातचे होम ग्राउंड असेल पण ते आमचे होम ग्राउंड आहे असे दिसते. आम्हाला प्रथम गोलंदाजी करायला आवडेल. दव हा एक मोठा घटक आहे म्हणून दव येण्यापूर्वी काही षटके खेळणे चांगले राहील. आमचे सराव सत्र चांगले होते, तयारी चांगली होती. काही सक्तीचे बदल झाले. पेरी, वेअरहॅम, डॅनी आणि किम.’, असं स्मृती मंधाना हीने सांगितलं. गुजरात जायंट्सने अ‍ॅशले गार्डनरने सांगितलं की, ‘आम्हीही गोलंदाजी करणार होतो पण ते ठीक आहे. गुजरातच्या मुलींशी आमचे चांगले संबंध निर्माण झाले आहेत. आमच्या संघात तरुणाई आणि अनुभव आहे. सुरुवात करण्यास उत्सुक आहे. पाच पदार्पण करणार आहे. ‘

दोन्ही संघांची प्लेइंग 11

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), डॅनियल व्याट-हॉज, एलिस पेरी, रघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, प्रेमा रावत, जोशिता व्हीजे, रेणुका ठाकूर सिंग.

गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मूनी (विकेटकीपर), दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, सिमरन शेख, तनुजा कंवर, सायली सातघरे, प्रिया मिश्रा, काशवी गौतम.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.