WPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सकडून हातातला सामना गमावल्यानंतर कर्णधार दीप्ती शर्मा वैतागली, म्हणाली..
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने युपी वॉरियर्सचा 7 गडी राखून पराभव केला. शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर हा विजय मिळवला. त्यामुळे युपी वॉरियर्सच्या हातातला सामना गेला. या स्पर्धेत युपीचा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवानंतर युपी वॉरियर्सची कर्णधार दीप्ती शर्मा चांगलीच वैतागलेली दिसली.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत युपी वॉरियर्सची सुरुवात काही चांगली झालेली नाही. सलग दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने गुणतालिकेत शून्य गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. नाणेफेकीचा कौल गमवल्याने युपी वॉरियर्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. पण युपी वॉरियर्सने 20 षटकात 7 गडी गमवून 166 धावा केल्या आणि विजयासाठी 167 धावांचं आव्हान दिलं. दिल्ली कॅपिटल्सने हे आव्हान 19.5 षटकात तीन गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात काही ठिकाणी युपी वॉरियर्सच्या खेळाडूंनी मिस फिल्ड केली. त्याचा फटका संघाला बसला आणि पराभवाचं तोंड पाहावं लागलं. इतकंच काय तर कर्णधार दीप्ती शर्मा या पराभवामुळे चांगलीच वैतागलेली दिसली. तिने आपला राग तसा व्यक्त केला नाही. पण शब्दात बरंच काही सांगून गेली. गचाळ क्षेत्ररक्षण केलं नसतं तर सामन्याचा निकाल वेगळा असता असं सांगायलाही विसरली नाही.
युपी वॉरियर्सची कर्णधार दीप्ती शर्मा म्हणाली की, हा एक चांगला स्कोअर होता, फलंदाजी युनिट म्हणून आम्ही सलग दोन विकेट गमावल्या. स्कोअर आणि 180-190 च्या आसपासच्या स्कोअर या खेळपट्टीवर विजयी स्कोअर होता. त्यांनी पॉवर प्ले दरम्यान चांगली फलंदाजी केली, आम्ही काही टाइट ओव्हर्समध्ये चांगले पुनरागमन केले. परंतु जर आम्ही चांगले क्षेत्ररक्षण केले असते तर निकाल खूप वेगळा असू शकला असता. आम्ही शेवटच्या चेंडूवर दोन्ही सामने गमावले आहेत, आम्ही हार मानली नाही, संघ चांगला खेळत आहे, आम्ही या स्कोअरचे रक्षण करू शकलो असतो, आम्हाला सकारात्मक राहून पुढे चांगले क्रिकेट खेळण्याची गरज आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, मॅरिझाने कॅप, अॅनाबेल सदरलँड, निकी प्रसाद, सारा ब्राइस (विकेटकीपर), जेस जोनासेन, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी.
यूपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन) : किरण नवगिरे, वृंदा दिनेश, उमा चेत्री (विकेटकीपर), दीप्ती शर्मा (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, चिनेल हेन्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, क्रांती गौड, राजेश्वरी गायकवाड.
