WPL 2026: मुंबई इंडियन्स रिटेन केलेल्या पाच खेळाडूंवर खर्च केले कोट्यवधी, आता फक्त 5.75 कोटी शिल्लक
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेसाठी फ्रेंचायझींनी फासे टाकण्यास सुरुवात केली आहे. कोणत्या खेळाडूवर डाव लावायचा आणि कोणाला रिलीज करायचं यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मुंबईने पाच पैकी पाच खेळाडू रिटेन केले आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये मोजले आहेत.

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी 27 नोव्हेंबरला मेगा लिलाव होणार आहे. यासाठी सर्वच फ्रेंचायझींना रिटेन्शन डेडलाईन होती. त्यानुसार पाचही फ्रेंचायझींनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. यंदाचं चौथं पर्व आहे आणि प्रत्येक तीन वर्षानंतर मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक फ्रेंचायझीला पाच खेळाडू रिटेन करण्याची मुभा होती. मुंबई इंडियन्स त्या दृष्टीने आपलं पावलं टाकली आहे. मुंबई इंडियन्सने दोन वेळा जेतेपदाला गवसणी घातली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबईने हे यश मिळवलं आहे. यंदाही हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात संघ मैदानात उतरणार यात काही शंका नाही. मुंबई इंडियन्स पाच पैकी पाच खेळाडू रिटेन केले आहेत. कर्णधार हरमनप्रीत कौरसाठी 2.5 कोटी, विदेशी स्टार खेळाडू नॅट स्कायवर ब्रंटसाठी 3.5 कोटी, हिली मॅथ्यूजसाठी 1.75 कोटी, अष्टपैलू अमनजोत कौरसाठी 1 कोटी आणि अनकॅप्ड जी कमलिनीसाठी 50 लाख रुपये मोजले आहेत.
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत हे पाचही खेळाडू मुंबई इंडियन्सकडू खेळतील. मुंबईने रिटेन केलेल्या पाच पैकी तीन खेळाडू हे भारतीय कॅप्ड खेळाडू आहेत. एक विदेशी कॅप्ड खेळाडू आणि एक अनकॅप्ड भारतीय खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सने पाचही खेळाडू रिटेन केल्याने मेगा लिलावात राईट टू मॅचचा पर्याय नसेल. मुंबई इंडियन्स रिटेन केलेल्या पाच खेळाडूंवर 9.25 कोटी खर्च केले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये मेगा लिलावासाठी 5.75 कोटी शिल्लक आहेत. या रकमेत आता इतर खेळाडूंसाठी बोली लावायची आहे. लिलावासाठी प्रत्येक संघाला 15 कोटी खर्च करण्याची परवानगी आहे. त्यामुळे रिटेन केलेल्या रक्कम वजा करून शिल्लक रकमेत मेगा लिलावात बोली लावावी लागणार आहे.
Mumbai, पाहा आपले 𝐑𝐞𝐭𝐚𝐢𝐧𝐞𝐝 stars! 🤩#AaliRe #MumbaiIndians #TATAWPL pic.twitter.com/tXnmFD0L8m
— Mumbai Indians (@mipaltan) November 6, 2025
मुंबई इंडियन्स मेगा लिलावात लॉरा वॉल्वार्ट, अष्टपैलू दीप्ती शर्मा यांच्यावर नजर असणार आहे. कारण गुजरात जायंट्सने ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनी आणि एशले गार्डनर यांना रिटेन केलं आहे. त्यामुळे लॉराला रिटेन करता आलं नाही. तर युपी वॉरियर्सने श्वेता सेहरावतला रिटेन केलं आहे. त्यामुळे दीप्ती शर्माला पर्याय इतर फ्रेंचायझींना असणार आहे. पण युपी वॉरियर्स तिच्यासाठी राईट टू मॅच कार्ड वापरू शकते. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने मेग लॅनिंगला रिलीज केलं आहे.
