AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025 Final, AUS vs SA : दक्षिण अफ्रिकेचा डाव 138 धावांवर आटोपला, ऑस्ट्रेलियाकडे 74 धावांची आघाडी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसून आला. पहिल्या डावात 212 धावा करूनही दक्षिण अफ्रिकेला त्याच्या आत रोखण्यात यश आलं. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सहा विकेट घेत निम्मा संघ तंबूत पाठवला.

WTC 2025 Final, AUS vs SA : दक्षिण अफ्रिकेचा डाव 138 धावांवर आटोपला, ऑस्ट्रेलियाकडे 74 धावांची आघाडी
पॅट कमिन्सImage Credit source: ICC
| Updated on: Jun 12, 2025 | 6:44 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत होत आहे. पहिल्या दिवशी दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला 212 धावांवर रोखलं. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी दक्षिण अफ्रिकेची दाणादाण उडवून दिली. 212 धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण अफ्रिकन संघाला 138 धावांवर रोखलं. तसेच पहिल्या डावात 74 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच पहिल्या डावाचा खेळ संपल्याने उर्वरित तीन दिवसात या कसोटीचा निकाल लागणार हे स्पष्ट झालं आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 250हून अधिक धावा केल्या तर या धावांचा पाठलाग करणं दक्षिण अफ्रिकेला कठीण जाईल. आता या स्पर्धेचं जेतेपद ऑस्ट्रेलियाकडे राहतं की दक्षिण अफ्रिका पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरतं हे सामन्याच्या चौथ्या दिवसापर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 212 धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचे आघाडीचे फलंदाज फेल गेले. एडन मार्करमला तर खातंही खोलता आलं नाही. रायान रिकल्टनने 16 धावा, वियान मुल्डर फक्त 6 धावा करून बाद झाला. कर्णधार टेम्बा बावुमाने त्यातल्या त्यात डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही फार काही यश आलं नाही. त्याने 84 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार मारून 36 धावा केल्या. डेविड बेडिंघमने मधल्या फळीत चांगली खेळी केली. एकीकडे विकेट पडत असताना एका बाजूने डाव सावरला. त्याने 45 धावांची खेळी केली. दुसरीकडे, काइल वेरियन्ने 13 धावा, तर मार्को यानसेनला खातंही खोलता आलं नाही. कसोटी क्रिकेटमध्ये धावचीत होणं हा खरा तर गुन्हा असतो. केशव महाराज मोक्याच्या क्षणी धावची होत तंबूत परतला.

दक्षिण अफ्रिकेकडून पॅट कमिन्सने जबरदस्त गोलंदाजी केली. दक्षिण अफ्रिकेच्या सहा फलंदाजांना तंबूत पाठवलं. पॅट कमिन्सने 18.1 षटकात 28 धावा देत 6 गडी बाद केले. यासह कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट घेणार पॅट कमिन्स हा आठवा गोलंदाज ठरला आहे. तर मिचेल स्टार्कने 2 आणि जोश हेझलवूडने एक गडी बाद केला.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.