AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशस्वी जयस्वालकडून षटकरांची आतषबाजी, फक्त 47 चेंडूत ठोकल्या 104 धावा Watch Video

भारताचा डावखुरा फलंदाज यशस्वी जयस्वाल याला टी20 संघात स्थान मिळणं कठीण झालं आहे. दुसरीकडे, वनडे आणि कसोटीत त्याने आपली जागा पक्की केली आहे. टी20 संघात स्थान मिळालं नसलं तरी त्याने आक्रमक खेळीने लक्ष वेधून घेतलं आहे.

यशस्वी जयस्वालकडून षटकरांची आतषबाजी, फक्त 47 चेंडूत ठोकल्या 104 धावा Watch Video
यशस्वी जयस्वालकडून षटकरांची आतषबाजी, फक्त 47 चेंडूत ठोकल्या 104 धावा Watch VideoImage Credit source: PTI
| Updated on: Jan 19, 2026 | 7:54 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी यशस्वी जयस्वालला संघात काही स्थान मिळालं नाही. पण दोन खेळाडूंची दुखापत पाहता कधीही लॉटरी लागू शकते अशी स्थिती आहे. असं असूनही त्याला टी20 संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण यशस्वी जयस्वालने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मग ते आयपीएल असो की क्रिकेटचा कोणताही फॉर्मेट.. त्याने आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टीम इंडियाच्या टी20 संघातील स्पर्धा पाहता यशस्वी जयस्वालला स्थान मिळणं कठीण झालं आहे. पण यशस्वी जयस्वालने आपल्या आक्रमक खेळीने पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने अवघ्या 47 चेंडूत शतक ठोकलं. पण हे शतक यशस्वी जयस्वालने ठोकलं तरी कधी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण यशस्वी जयस्वाल तर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत होता. पण त्याला संधी मिळाली नाही. त्यामुळे या मालिकेत शतक ठोकण्याचा प्रश्नच येत नाही. त्याने सराव सामन्यातही असं काही केलं नाही. यशस्वीने ही कामगिरी इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनच्या कार्यक्रमात केली.

यशस्वी जयस्वालने चॅलेंज जिंकलं आणि ठोकलं शतक

इंग्लंडचा माजी कर्णधार पीटरसन हा दिग्गज खेळाडूंच्या मुलाखती घेत असतो आणि क्रिकेटशी निगडीत आव्हान देत असतो. असंच एक चॅलेंज पीटरसनने यशस्वी जयस्वालला दिलं होतं. यशस्वी जयस्वालने हे चॅलेंज पूर्ण केलं. इंग्लंडच्या स्थानिक मैदाना हे आव्हान पार पडलं. पीटरसनने यशस्वी जयस्वालला 50 चेंडूत 100 धावा करण्याचं आव्हान दिलं होतं. पण यात दोन अटी ठेवल्या होत्या. यात प्रत्येक चेंडूनंतर वेग 1 मैल प्रतितास वाढेल आणि दुसरं बाद झाल्यावर धावसंख्यातून 5 धावा वजा केल्या जातील. समोर कोणी गोलंदाज नव्हता तर एक मशिन होतं. तर क्षेत्ररक्षणासाठी खेळाडू तैनात होते.

यशस्वी जयस्वालने चौकार आणि षटकार मारण्यास सुरुवात केली. यात यशस्वी जयस्वाल दोन वेळा बाद झाला. त्यामुळे 10 धावा वजा करण्यात आला. चेंडूंचा वेग वाढत असल्याने काही चेंडू मारतात चुकला. पण जयस्वालन हे आव्हान पूर्ण केलं. 47 चेंडूत 100 धावांचं आव्हान पूर्ण केलं. यशस्वी जयस्वालने 3 चेंडू राखून हे आव्हान गाठलं. 47 व्या चेंडूवर षटकार मारला आणि शतक पूर्ण केलं. समोर मशिन असली म्हणून काय झालं. यशस्वीने वेगाचा सामना करण्यास सज्ज असल्याचं दाखवून दिलं. आता यशस्वी जयस्वाल टी20 संघात नाही. त्यामुळे थेट आयपीएल खेळताना दिसेल.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग