AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शतकानंतर यशस्वी जयस्वालचा फ्लाइंग किस, हाताने हृदय साकारत कोणाकडे केला इशारा?

यशस्वी जयस्वालने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी शतकी खेळी करत क्रीडाप्रेमींची मन जिंकलं. पण शतक ठोकल्यानंतर यशस्वी जयस्वालचं सेलीब्रेशन खास राहिलं. त्याच्या सेलिब्रेशनची चर्चा आता रंगली आहे.

शतकानंतर यशस्वी जयस्वालचा फ्लाइंग किस, हाताने हृदय साकारत कोणाकडे केला इशारा?
शतकानंतर यशस्वी जयस्वालचा फ्लाइंग किस, हाताने हृदय साकारत कोणाकडे केला इशारा?Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Oct 10, 2025 | 8:59 PM
Share

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालची बॅट चांगलीच तळपली. त्याने त्याच्या कसोटी कारकि‍र्दीतलं सातवं शतक ठोकलं. यासह त्याने काही विक्रम आपल्या नावावर केले. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्याकडून द्विशतकी खेळीची अपेक्षा आहे. आता दुसर्‍या दिवशी यशस्वी जयस्वाल कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. पण यशस्वीने शतक ठोकलं आणि त्याच्या हटके सेलिब्रेशनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने बॅट, ग्लव्ह्स आणि हेल्मेट जमिनीवर ठेवलं आणि दोन्ही हात जवळ घेऊन हार्ट शेप तयार केला. खरं तर त्याने हा इशारा ड्रेसिंग रुमच्या दिशेने केला. पण त्याच्या हटके सेलिब्रेशनचं कनेक्शन त्याचे चाहते वेगळंच जुळवत आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहते हा हार्ट कोणासाठी नाही तर त्याच्या रूमर्ड गर्लफ्रेंडसाठी असावा अंदाज बांधत आहेत.

क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालचं नाव मॅडी हॅमिल्टनशी जोडलं जात आहे. टीम इंडियाचा ओपनर आणि मॅडीच्या कुटुंबियात जवळीक वाढली आहे. त्यामुळे त्यांच्यात काहीतरी सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. 2022 मध्ये मॅडीने कुटुंबियांसोबत एक फोटो शेअर केला होता. इतकंच काय तर मॅडी हॅमिल्टन भारतात अनेकदा कॅमेऱ्यात चित्रित देखील झाली आहे. इंग्लंडच्या भारत दौऱ्यावेळी यशस्वी जयस्वालने दोन द्विशतके झळकावली होती. तेव्हा मॅडी इंग्लंडच्या स्टँडमध्ये होती. इतकंच काय तर आयपीएल दरम्यान मॅडी हॅमिल्टननेही राजस्थान रॉयल्सची जर्सी घातली होती. पण दोघांनी कधीच काहीच सांगितलेलं नाही. त्यामुळे या सध्यातरी सोशल मीडियावरील चर्चा आहेत.

दरम्यान, शतकी खेळीनंतर त्याने ड्रेसिंग रुमच्या दिशेने केलेल्या सेलिब्रेशननंतर गौतम गंभीर खूश झाला होता. त्यामुळे त्याने आनंद व्यक्त केला असं काहीचं म्हणणं आहे. यशस्वीने यापूर्वी असंच सेलीब्रेशन इंग्लंडमध्ये केलं होतं. तेव्हा यशस्वीने खुलासा केला होता की ,त्याने स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या पालकांसाठी त्याचे शतक साजरे केले. जयस्वाल तेव्हा म्हणाला होता की, “हे सेलिब्रेशन माझ्या आई आणि वडिलांसाठी होतं. माझे कुटुंब तिथे होते, मी खूप उत्साहित होतो आणि तो माझ्यासाठी खूप भावनिक क्षण होता.’

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.