AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Year End 2025: कोण आहे यंदाचा गुगल सर्च सम्राट? सर्वाधिक सर्च झालेले 10 प्लेअर; टॉपवर वैभव सूर्यवंशी, कोण आहेत इतर?

Google Search Top 10 Searched: गुगलने भारतात यंदा सर्वाधिक वेळा कुणाचे नाव सर्च करण्यात आले याची यादी जाहीर केली आहे. या यादीत वैभव सूर्यवंशीने बाजी मारली आहे. तर इतरही अनेक जणांचा यामध्ये समावेश आहे. कोण आहेत ही मंडळी? जाणून घ्या गुगलचे टॉप सर्च सम्राट...

Year End 2025: कोण आहे यंदाचा गुगल सर्च सम्राट? सर्वाधिक सर्च झालेले 10 प्लेअर; टॉपवर वैभव सूर्यवंशी, कोण आहेत इतर?
गुगल सर्च वैभव सूर्यवंशी ईअर एंड 2025Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Dec 10, 2025 | 4:08 PM
Share

Google Search 2025: गुगलने भारतात 2025 मध्ये सर्वाधिक काय सर्च करण्यात आले याची यादी जाहीर केली आहे. टॉप ट्रेडिंग सर्चमध्ये यंदा खेळाडूंचा दबदबा दिसून आला. या सर्च यादीत सर्वात जास्त इंडियन प्रीमियर लिग, तिसऱ्या क्रमांकावर आशिया कप, चौथ्या क्रमांकावर ICC चॅम्पियन ट्रॉफी, 5 व्या स्थानी प्रो कबड्डी लिग आणि 7 व्या क्रमांकावर महिला विश्वचषकचा समावेश आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर यंदा गुगल जेमिनी सर्च झाले. सहाव्या स्थानी कुंभमेळा होता. तर आठव्या क्रमांकावर GROK, नवव्या क्रमांकावर सैयारा आणि दहाव्या क्रमांकावर दिवगंत बॉलिवूड हिरो धर्मेंद्र यांचा समावेश आहे.

यादीत सूर्यवंशींचे ‘वैभव’

सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आलेली व्यक्ती क्रिकेटचे तुफान वैभव सूर्यवंशी हा सर्वात कमी वयाचा स्फोटक फलंदाज राहिला. गुगलने भारतात यंदा काय काय सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आले, त्याची यादी जाहीर केली आहे. त्यात सूर्यवंशींने वैभव मिळवले आहे. तो सर्वाधिक वेळा गुगलवर सर्च केला गेला. त्याचे वय, त्याचा अभ्यास, त्याचा रेकॉर्ड यामध्ये अनेकांना रूची आहे. त्याचे वडील काय करतात. तो कुठे शिकला. त्याला भारतीय संघात स्थान मिळेल का, असा सर्चचा आलेख होता.

भारतात 2025 मध्ये एकूण टॉप ट्रेंडिंग सर्च

1. इंडियन प्रीमियर लिग

2. Google Gemini

3. आशिया कप

4. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी

5. प्रो कबड्डी लिग

6. कुंभ मेळा

7. महिला विश्वचषक

8. ग्रोक

9. सैयारा

10. धर्मेंद्र

सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आलेले क्रिकेटर्स

भारतात यंदा अनेक दिग्गजांविषयी गुगलमध्ये सर्च करून माहिती घेण्यात आली. यामध्ये वैभव सूर्यवंशीसह इतरही अनेक क्रिकेटर्सचा समावेश आहे. या क्रिकेटर्समध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल सारख्या दिग्गजांनी जागा पटकावली आहे. या खेळाडूंमध्ये अर्थातच वैभव सूर्यवंशीने अव्वल स्थान पटकावलं आहे.

2025 मध्ये भारतात सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आलेल्या व्यक्ती

1- वैभव सूर्यवंशी

2. प्रियांश आर्य

3. अभिषेक शर्मा

4. शाएक राशिद

5. जेमिमा रोड्रिग्स

6. आयुष म्हात्रे

7. स्मृती मानधना

8. करुण नायर

9. उर्विल पटेल

10. विग्नेश पुथुर

2025 मध्ये भारतात सर्वाधिक वेळा सर्च झालेल्या 5 महिला

1. जेमिमा रोड्रिग्स

2. स्मृती मानधना

3. शेफाली वर्मा

4. सुनीता विलियम्स

5. हरमनप्रीत कौर

जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी
तू अजून जिवंत? BJP नेत्याला तुकाराम मुंढेंच्या इशाऱ्यावरून पुन्हा धमकी.
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?.
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध..
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध...
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर.
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद.
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट...
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट....
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?.
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?.