Vaibhav Suryavanshi: पाकिस्तानी गोलंदाजांना फोडून काढणार, सामन्यात बॅट नाही जणू तलवार फिरणार, वैभव सूर्यवंशीची मोठी दहशत
Vaibhav Suryavanshi Batting: भारताचा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी पाक खेळाडूंना गंगेचे पाणी पाजणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. पाक गोलंदाजांना वैभव फोडून काढण्याचा दावा सोशल मीडियावर रंगला आहे. कधी भिडणार पाक-भारत संघ?

Vaibhav Suryavanshi against Pakistan: भारताचा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याला सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून अचानक मोकळं करण्यात आलं. तो बिहार संघात उपकर्णधार म्हणून खेळत होता. वैभवला अचानक या स्पर्धेतून मोकळं करण्यामागे 19 वर्षांखालील आशिया कप स्पर्धा(Asia Cup Under 19) असल्याचे बोलले जात आहे. आशिया कपची सुरुवात तीन दिवसांनी 12 डिसेंबर रोजी होत आहे. वैभव आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरेल. या टुर्नामेंटचा पहिला सामना भारत विरुद्ध युएई संघात होत आहे.
वैभवची बॅट तळपणार
अर्थात या आशिया कपमध्ये सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीच्या तडाखेबंद खेळीकडे लागलेले आहेत. वैभव सूर्यवंशीने यापूर्वी रायझिंग टुर्नामेंटमध्ये जलवा दाखवला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये येत्या रविवारी, 14 डिसेंबर रोजी महासंग्राम होईल. अंडर-19 आशिया कपसाठी दोन्ही संघ भिडतील. या सामन्यात वैभवची बॅट तळपण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दुबईतील आयसीसी ॲकडमी ग्राऊंडवर हा सामना होणार आहे. या सामन्यात वैभव पाकिस्तानी गोलंदाजांचा फज्जा उडवणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी चाहते आसुसले आहेत.
यापूर्वी पाकिस्तानविरोधात दमदार प्रदर्शन
वैभव सूर्यवंशीने इंडिया ए संघासाठी आशिया कप रायझिंग स्टार टुर्नामेंटमध्ये पाकिस्तान शाहीनविरोधात सामना खेळला. पाकिसान शाहीनविरोधातील सामन्यात वैभवने 28 चेंडूत 45 धावांची खेळी खेळली. या सामन्यात वैभवने 5 चौकार आणि षटकार पण ठोकले. या सामन्यात वैभवनेच सर्वाधिक धावा ठोकल्या होत्या. पण या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
वैभवचा फॉर्म हरवला
वैभव सूर्यवंशी गेल्या काही दिवसांपासून मैदानावर आहे. पण त्याला सूर गवसलेला दिसला नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत तो बिहार संघाकडून मैदानात उतरला. बिहार संघाला या ट्रॉफीत उल्लेखनीय कामगिरी बजावता आली नाही. पण महाराष्ट्रविरोधात वैभवने दमदार शतक ठोकले. पण त्यानंतर त्याला सूर गवसला नाही. बिहारसाठी स्थानिक टी20 टूर्नामेंटच्या 6 सामन्यात तो मैदानात उतरला खरा पण त्याला केवळ 197 धावा काढता आल्या.
