IPL 2022, Purple Cap : युझवेंद्र चहल पर्पल कॅपचा बादशहा, सर्वाधिक विकेट घेणार टॉप 5 खेळाडू जाणून घ्या…

आयपीएलचा पॉईंट्स टेबल बघितल्यास युझवेंद्र चहल पहिल्या क्रमांकावर असून त्याने आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये सर्वाधिक 26 विकेट घेतल्या आहेत.

IPL 2022, Purple Cap : युझवेंद्र चहल पर्पल कॅपचा बादशहा, सर्वाधिक विकेट घेणार टॉप 5 खेळाडू जाणून घ्या...
आयपीएलच्या पर्पल कॅपमध्ये युझवेंद्र चहल पहिल्या क्रमांकावरImage Credit source: Rajasthan Royals Twitter
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 3:11 PM

मुंबई : दरवर्षी आयपीएल (IPL 2022) स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे (Purple Cap) क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. मंगळवारी आयपीएलच्या पंधराव्या सीझनमधील पहिला क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला गेला. यात गुजरातने आपला विजयीरथ कायम ठेवत थेट फायनमध्ये धडक मारली आहे. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकात 6 विकेट गमावून 188 धावा करत गुजरात टायटन्सला विजयासाठी 189 धावांचे लक्ष्य दिले. जोस बटलरने (Jos Butler)  सर्वाधिक 89 धावांचे योगदान दिले. त्याने 56 चेंडूंच्या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकार मारले. डावाच्या शेवटच्या षटकात तो धावबाद झाला. अटीतटीचा हा सामना शेवटच्या शटकापर्यंत पोहोचला होता. या सामन्याचा चांगलाच थरार यावेळी प्रेकांना अनुभवता आला. यानंतर आयपीएलच्या  पर्पल कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया…

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

आयपीएलच्या पर्पल कॅपमध्ये युझवेंद्र चहल पहिल्या क्रमांकावर असून त्याने आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये सर्वाधिक 26 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर वानिंदू आहे. याने आयपीएलच्या या सीजनमध्ये 24 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या स्थानी कागिसो रबाडा आहे. याने 23 विकेट घेतल्या आहेत. चौथ्या स्थानी उमरान मलिक आहे. उमराननं आयपीएलच्या या सीजनमध्ये 22 विकेट घेतल्या आहेत. तर पाचव्या स्थानी कुलदीप यादव आहे. कुलदीपने 21 विकेट घेतल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा 24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक 22444
कुलदीप यादव21419

कोणाला दिली जाते पर्पल कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

कुणाची बॅटिंग चमकली?

कालच्या सामन्यात सुरूवातीला राजस्थानकडून जॉस बटलरने तुफान फटकेबाजी करत राजस्थानला मजबूत स्थितीत पोहोचवले. मात्र दुसऱ्या डावात गुजरातच्या विकेट सुरूवातीला कोसळत असताना हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलरने चांगली भागिदारी करत हा विजय खेचून आणला. सुरूवातील शांत खेळणारा डेव्हिड मिलरच राजस्थानसाठी किलर ठरला. त्याने शेवटी तुफान फटकेबाजी केली. त्यामुळे अवघड दिसणार हा विजय गुजरातसाठी सोपा बनला.

Non Stop LIVE Update
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.