AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : 2 सामने-1 मालिका, आशिया कपआधी टीमसमोर 16 खेळाडूंचं आव्हान, पहिली मॅच केव्हा?

Zimbabwe vs Sri Lanka Odi Series 2025 : झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका यांच्यात एकूण 2 एकदिवसीय सामन्यांचा थरार रंगणार आहे. ही मालिका 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे.

Cricket : 2 सामने-1 मालिका, आशिया कपआधी टीमसमोर 16 खेळाडूंचं आव्हान, पहिली मॅच केव्हा?
Asia Cup TrophyImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Aug 26, 2025 | 1:09 AM
Share

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर थेट आशिया कप 2025 स्पर्धेत खेळणार आहे. तर दुसर्‍या बाजूला या स्पर्धेआधी पाकिस्तान, यूएई आणि अफगाणिस्तान तिन्ही संघ टी 20i ट्राय सीरिज खेळणार आहेत. ही मालिका आणि आशिया कप स्पर्धा यूएईमध्ये होणार आहे. त्यामुळे या तिन्ही संघांना आशिया कपआधी या मालिकेमुळे मदत होऊ शकते. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका आशिया कपआधी झिंबाब्वे दौऱ्यात वनडे आणि टी 20i सारिज खेळणार आहे. श्रीलंका क्रिकेट टीम काही दिवसांपूर्वी झिंबाब्वेत दाखल झाली. त्यानंतर आता यजमान झिंबाब्वेने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम जाहीर केली आहे.

श्रीलंकेचा झिंबाब्वे दौरा

श्रीलंका झिंबाब्वे दौऱ्यात 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान 2 एकदिवसीय आणि 3 टी 20 सामने खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेला शुक्रवार 29 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर दुसरा आणि अंतिम सामना हा रविवारी 31 ऑगस्टला पार पडणार आहे. झिंबाब्वेने या एकदिवसीय मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. झिंबाब्वे क्रिकेट या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे. क्रेग एरव्हीन झिंबाब्वेचं नेतृत्व करणार आहे.

ब्रँडन टेलर याचं कमबॅक झालं आहे. टेलरने सप्टेंबर 2021 मध्ये आयर्लंड विरुद्ध अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर जवळपास 4 वर्षांनी ब्रँडनच कमबॅक झालं आहे. टेलरव्यतिरिक्त रिचर्ड नगारावा याचं कमबॅक झालं आहे. तर ब्लेसिंग मुजाराबानी याला देखील संधी देण्यात आली आहे. तसेच झिंबाब्वेने 4 नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. या चौघांमध्ये क्लाईव्ह मडांडे, टोनी मनुयोंगा, ब्रॅड इवान्स आणि अर्नेस्ट मसुकू यांचा समावेश आहे.

ब्रँडन टेलरला 11 धावांची गरज

ब्रँडन टेलरला या 2 सामन्यांमध्ये इतिहास घडवण्याची संधी आहे. ब्रँडनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त 11 धावांची गरज आहे. ब्रँडनने तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 9 हजार 989 धावा केल्या आहेत.

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 29 ऑगस्ट, हरारे

दुसरा सामना, 31 ऑगस्ट, हरारे

एकदिवसीय मालिकेसाठी झिंबाब्वेचा संघ

एकाच मैदानात दोन्ही सामने

दरम्यान झिंबाब्वे विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दोन्ही एकदिवसीय सामने हे एकाच मैदानात खेळवण्यात येणार आहेत. हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये हे सामने होणार आहेत.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.