AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीच्या योद्ध्यावर शस्त्रक्रिया, ‘मी पुन्हा येईन’, जिगरबाज खेळाडूचा बेडवरुन पुनरागमनासाठी खास मेसेज!

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) माजी कर्णधार आणि भारताचा युवा जिगरबाज खेळाडू श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) शस्त्रक्रिया पार पाडली. | Delhi Capital Shreyas Iyer Surgery Shoulder IPL 2021

दिल्लीच्या योद्ध्यावर शस्त्रक्रिया, 'मी पुन्हा येईन', जिगरबाज खेळाडूचा बेडवरुन पुनरागमनासाठी खास मेसेज!
श्रेयस अय्यर
| Updated on: Apr 09, 2021 | 7:36 AM
Share

नवी दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) माजी कर्णधार आणि भारताचा युवा जिगरबाज खेळाडू श्रेयस अय्यरवर (Shreyas Iyer) शस्त्रक्रिया पार पाडली. हॉस्पिटलमधील बेड्सवरुन श्रेयसने मैदानावरील पुनरामनासाठी खास संदेश दिला आहे. ‘लवकरच मी पुनरामन करतोय’, असा मेसेज त्याने आपल्या चाहत्यांना आणि दिल्ली कॅपिटल्सच्या पाठीराख्यांना दिला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली होती. ज्यानंतर त्याने मालिकेतून माघार घेतली आणि डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरु केले. (Delhi Capital Shreyas Iyer Surgery Shoulder IPL 2021)

श्रेयसच्या खांद्यावर शस्त्रक्रिया

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत खांद्याला दुखापत झाल्यानंतर डॉक्टरांनी श्रेयसला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता श्रेयसच्या खांद्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली आहे. थेट हॉस्पिटलमधून त्याने आपला लेटेस्ट फोटो ट्विट केला आहे तसंच शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती दिली आहे. ‘वाघासारखा दृढ संकल्प करुन लवकरच मी मैदानात उतरेन’, आपल्या सगळ्यांच्या शुभ कामनांसाठी आभार, असं ट्विट त्याने केलं आहे.

फिल्डिंगदरम्यान श्रेयसला दुखापत

इंग्लंडविरुद्धच्या 23 मार्च रोजीच्या सामन्यात श्रेयसला फिल्डिंगदरम्यान दुखापत झाली होती. त्याच्या खांद्याच्या हाडाला मार लागला होता ज्यामुळे त्याला वेदना असह्य होत होत्या. इंग्लंडच्या डावाच्या 8 व्या ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरच्या बोलिंगवर श्रेयसने बेअरस्टोचा कॅच घेण्यासाठी सूर मारला. याच प्रयत्नावेळी त्याच्या खांद्याला मार लागला होता.

दिल्लीची जबाबदारी रिषभ पंतवर 

दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार श्रेयस अय्यर (Shyeyas Iyer) दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी 23 वर्षांच्या रिषभ पंतवर (Rishabh pant) संघाच्या कर्णधापदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रहाणे, धवन, स्मिथ, अश्विन अशा एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंना पछाडत पंतने बाजी मारली. आयपीएलच्या 14 व्या मोसमात आता दिल्लीचं नेतृत्व रिषभच्या हाती देण्यात आलं आहे.

(Delhi Capital Shreyas Iyer Surgery Shoulder IPL 2021)

हे ही वाचा :

IPL 2021 : मुंबईच्या फलंदाजांना वेसण घालणार?, विराट कोहलीकडून RCB च्या युवा बोलर्सचं तोंडभरुन कौतुक

IPL 2021 : मुंबईविरुद्ध पहिलीच मॅच, विराट कोहलीचं मॅचअगोदर ट्विट, संघ पाठीराख्यांना म्हणतो…

IPL 2021 : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु, सामना कधी, कुठे, केव्हा?

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.