Vaibhav Sooryavanshi : वैभवचा सिनियर टीम इंडियात समावेश कधी? अनिल कुंबळेंचे रोखठोक उत्तर, एकवेळ अशी येते जेव्हा..
Vaibhav Sooryavanshi : सध्या वैभव सूर्यवंशी जबरदस्त खेळ दाखवतोय. अनेक जण त्यांच्या टॅलेंटने प्रभावित झाले आहेत. सिनियर टीम इंडियात त्याचा कधी समावेश होईल असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. यावर दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी उत्तर दिलं आहे.

आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा खेळ पाहून अनेकांना हाच प्रश्न पडलाय की हा खेळाडू सिनियर टीमकडून कधी खेळणार? सोशल मीडियावर हीच चर्चा रंगली आहे. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स आणि काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध या 15 वर्षाच्या मुलाने कमाल केली. जसप्रीत बुमराहपासून हेझलवूड पर्यंतच्या सगळ्या मोठ्या बॉलर्सची वैभव मैदानावर धुलाई करतोय. त्यामुळे या युवा प्रतिभेला सिनियर टीम इंडियात कधी चान्स मिळणार? हा प्रश्न विचारला जाणं स्वाभाविक आहे. वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर संधी द्यावी अशी बहुतांश चाहत्यांची इच्छा असली तरी दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांचं वेगळ मत आहे. वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत घाई करु नये असं अनिल कुंबळे यांना वाटतं. त्याने त्याच्या खेळानेच उत्तर दिलय असं ते म्हणाले.
“एक अशी वेळ येते जेव्हा कुठल्याही खेळाडूला बाहेर ठेवणं कठीण होऊन बसतं. हीच गोष्ट सचिन तेंडुलकर सोबत सुद्धा झाली होती, जेव्हा तो टीममध्ये येणार होता. सचिन जेव्हा मैदानावर यायचा तेव्हा शतक झळकवायचा” असं अनिल कुंबळे म्हणाले. “जे आपण वैभव बद्दल पाहिलय. तो योग्य मार्गावर आहे हा मला विश्वास आहे. यावेळी आपण वैभववर दबाव टाकण्याची गरज नाही. आपल्याला पाहिजे म्हणून पुढच्या दोन महिन्यात त्याने भारताकडून खेळावं असं होऊ नये. मला विश्वास आहे की, तो ज्या पद्धतीने खेळतोय. निवडकर्त्यांची त्याच्यावर नजर आहे” असं अनिल कुंबळे म्हणाले.
या सीजनमध्ये वैभवने किती धावा केल्यात?
वैभव सूर्यवंशी मागच्या वर्षभरापासून दमदार प्रदर्शन करतोय. आयपीएलच्या तीन सामन्यात त्याने 122 धावा केल्या आहेत. त्याने सीजनची सुरुवात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 15 चेंडूत अर्धशतक झळकवून केली होती. या सीजनमध्ये आपल्या बॅटची जादू दाखवून तो टीम इंडियात प्रवेश करणार का? यावर सगळ्यांची नजर आहे. सचिन तेंडुलकरने वयाच्या 16 व्या वर्षी टीम इंडियात स्थान मिळवलं होतं.
VIDEO | Mumbai: Former India captain Anil Kumble has advised caution over fast-tracking teenage batting prospect Vaibhav Suryavanshi, saying player development should be guided by individual readiness rather than timelines imposed by selectors or public expectations.
“I think… pic.twitter.com/TwKAyadSWB
— Press Trust of India (@PTI_News) April 10, 2026
कधीपर्यंत टीम इंडियात समावेश होईल?
“क्रिकेटमध्ये यश मिळवण्याची अशी फिक्स टाइमलाइन नाहीय. खेळाडू करिअरच्या वेगवेगळ्या स्टेजवर टीममध्ये येऊन आपली छाप उमटवतात” याकडे कुंबळेने लक्ष वेधलं. “वैभव सूर्यवंशीचा यावर्षी, पुढच्यावर्षी किंवा दोन वर्षानंतर सिनियर टीम इंडियात समावेश होऊ शकतो. त्याच्या फलंदाजीवर सिलेक्टर्सची नजर असेलच” असं कुंबळे म्हणाला.
