AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 व्या वर्षी पदार्पण, पहिल्या कसोटीत ठोकल्या 95 धावा, 21 वर्षी करिअर संपलं, ‘तो’ कमनशिबी क्रिकेट कोण?

वयाच्या 21 व्या वर्षी जगातील बहुतेक खेळाडूंची कारकीर्द सुरु होते, परंतु या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द वयाच्या 21 व्या वर्षी संपली. तो खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा माजी विकेटकीपर अब्दुल कादिर... (Former Pakistan Player Abdul Kadir Cricket Career Story)

20 व्या वर्षी पदार्पण, पहिल्या कसोटीत ठोकल्या 95 धावा, 21 वर्षी करिअर संपलं, 'तो' कमनशिबी क्रिकेट कोण?
अब्दुल कादिर...
| Updated on: May 10, 2021 | 9:07 AM
Share

नवी दिल्ली :  आज अशा एका पाकिस्तानी क्रिकेटपटूचा वाढदिवस आहे की ज्याच्यासाठी दुर्दैवी किंवा कमनशिबी हे शब्द बनले असावेत. या खेळाडूने पदार्पणाच्या पहिल्याच कसोटी सामन्यात 95 धावा ठोकल्या. पण त्याची कसोटी कारकीर्द चार सामन्यांनंतरच संपुष्टात आली. वयाच्या 21 व्या वर्षी जगातील बहुतेक खेळाडूंची कारकीर्द सुरु होते, परंतु या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द वयाच्या 21 व्या वर्षी संपली. तो खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा माजी विकेटकीपर अब्दुल कादिर (Abdul kadir)… (Former Pakistan Player Abdul Kadir Cricket Career Story)

अब्दुल कादिर याचा जन्म 10 मे 1944 रोजी कराची येथे झाला होता. ऑक्टोबर 1964 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तान संघात त्याची निवड झाली होती. त्याच्यासह आणखी पाच नवीन खेळाडू त्या संघाचा हिस्सा होते. हा सामना कराचीमध्ये खेळला गेला. अब्दुल कादिरला पदार्पण करण्याची संधी मिळाली. 20 वर्षीय कादिरने बिल्ली इब्दुल्लाह बरोबर पाकिस्तानच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी मिळून 249 धावांची सलामी भागीदारी केली. त्यावेळी पाकिस्तानसाठी कोणत्याही विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागीदारी होती. सलामीची पाकिस्तानसाठी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा या जोडीचा विक्रम 1997-98 पर्यंत कायम होता.

पहिल्या कसोटीत शतक हुकलं

इब्दुल्लाहने 166 धावांची खेळी केली परंतु अब्दुल कादिरचं पदार्पणातील कसोटी सामन्यात शतक पाच धावांनी हुकलं. 95 धावांवर तो धावबाद झाला. याच कसोटी सामन्यात विकेट किपींग त्याने एक स्टम्पिंग केलं. क्रिकेटमधील त्याचं ते पहिलं आणि शेवटचं स्टम्पिंग ठरलं.

दीड महिन्यानंतर पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेला. मेलबर्न कसोटीदरम्यान कादिरचा ग्रॅहम मॅकेन्झीच्या चेंडूवर अंगठा तोडला. दुसर्‍या डावात फलंदाजीसाठी तो सातव्या क्रमांकावर आला. त्याने 35 धावांची खेळी केली आणि कर्णधार हनिफ मोहम्मदबरोबर 46 धावांची भागीदारी रचली. कादिरच्या दुखापतीमुळे हनीफ मोहम्मदने कीपरची जबाबदारी सांभाळली आणि यष्टीमागे पाच बळी घेतले.

5 तास बॅटिंग, 58 रन्स….

ऑस्ट्रेलियानंतर पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडला गेला. तिथं अब्दुल कादिर फक्त फलंदाज म्हणून खेळला. पहिल्या कसोटीत त्याने 46 धावा केल्या. दुसर्‍या कसोटी सलामीच्या येऊन त्याने 12 आणि 58 धावा केल्या. 58 धावांच्या खेळीच्या वेळी त्याने 5 तास फलंदाजी केली. पण या खेळीनंतर त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली. त्याने चार कसोटींमध्ये 34 च्या सरासरीने 272 धावा केल्या.

त्याचवेळी अब्दुल कादिरने फर्स्ट क्लासच्या 36 सामन्यांत 28.73 च्या सरासरीने 1523 धावा केल्या. त्याच्या नावावर एका शतकाची नोंद आहे. वयाच्या 57 व्या वर्षी 12 मार्च 2002 रोजी कराची येथे अब्दुल कादिरचं निधन झालं.

(Former Pakistan Player Abdul Kadir Cricket Career Story)

हे ही वाचा :

Video : चहलची बायको धनश्रीच्या आईचा Mothers Day ला श्रद्धा कपूरच्या गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल

माझ्या वडिलांचा जीव कोरोना लसीने वाचवला, आर अश्विनने सांगितला भावूक प्रसंग

न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूची फॅन्सला हात जोडून विनंती, म्हणाला, ‘2019 च्या फायनलची…..’

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.