Sourav Ganguly | सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत दुसरी मोठी शक्यता, दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी होणार?

संजय पाटील, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 03, 2021 | 3:10 PM

गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला जीममध्ये वर्कआऊट करताना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला. यानंतर गांगुलीला वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल केले गेले.

Sourav Ganguly | सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत दुसरी मोठी शक्यता, दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी होणार?
गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला जीममध्ये वर्कआऊट करताना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला. यानंतर गांगुलीला वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल केले गेले.
Follow us

कोलकाता : बीसीसीआय अध्यक्ष (bcci President) आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) प्रकृतीबाबत मोठी अपडेट आली आहे. गांगुली आता सुखरुप आहे. गांगुलीच्या जीवाला आता कसलाही धोका नाही, अशी माहिती वुडलॅंड्स रुग्णालयाने दिली आहे. वुडलॅंड्स रुग्णालयाने मेडिकल बुलेटिनद्वारे ही माहिती दिली आहे. गांगुलीला शनिवारी 2 जानेवारीला जीममध्ये वर्कआऊट करताना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला. यानंतर गांगुलीला वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल केले गेले. त्यानंतर गांगुलीवर यशस्वीरित्या अँजियोप्लास्टी करण्यात आली. तसेच कोरोना अहवालही नेगेटिव्ह आला. (former team india captain and bcci president Possibility of second angioplasty on Sourav Ganguly)

डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिमध्ये काय सांगितलं?

“गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. त्याला कशाचाही धोका नाही. गांगुली सध्या विश्रांती घेत आहे. गांगुलीचा रक्तदाब 110/70 इतका आहे. तसेच ऑक्सिजन लेवलही 98 इतकी आहे. गांगुलीवर दुसऱ्यांदा अँजियोप्लास्टी करण्याची आवश्यकता आहे. कारण एकूण हार्ट ब्लॉक काढण्यात आले नाहीत. काही वेळात अँजियोप्लास्टी करण्यात येणार आहे”, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

गांगुलीला ट्रिपल वेसल डिजीजची बाधा

गांगुलीला Triple vessel disease ची बाधा आहे. यामुळे गांगुलीच्या हृदयाला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. यामुळेच त्याला  ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

सौरव गांगुलीची क्रिकेट कारकिर्द

सौरव गांगुलीने 113 कसोटी, 311 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. गांगुलीने एकूण 311 सामन्यात 22 शतकांसह 73.71 च्या स्ट्राईक रेटने एकूण 11 हजार 363 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्याने 100 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच 113 कसोटींमध्ये त्याने 16 शतकांसह 7 हजार 212 धावा केल्या आहेत. तसेच 32 विकेट्सही त्याने घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या :

अँजियोप्लास्टीनंतर सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, कोरोना चाचणी निगेटिव्ह

Sourav Ganguly Update: सौरव गांगुलीची तब्येत ठणठणीत, ऑक्सीजन सपोर्ट हटवले

(former team india captain and bcci president Possibility of second angioplasty on Sourav Ganguly)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI