नॅशनल चॅम्पियन स्पर्धेतील विजयी खेळाडूंच्या पाठीवर पालकमंत्र्यांकडून कौतुकाची थाप

वारंगल तेलंगणा आणि दिल्ली येथे पार पडलेल्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत विजयाची पताका फडकावणाऱ्या नाशिकच्या खेळाडूंच्या पाठीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कौतुकाची थाप मारली.

नॅशनल चॅम्पियन स्पर्धेतील विजयी खेळाडूंच्या पाठीवर पालकमंत्र्यांकडून कौतुकाची थाप
नाशिकच्या विजेत्या खेळाडूंचा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गौरव केला.
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 6:10 PM

नाशिकः वारंगल तेलंगणा आणि दिल्ली येथे पार पडलेल्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत विजयाची पताका फडकावणाऱ्या नाशिकच्या खेळाडूंच्या पाठीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कौतुकाची थाप मारली. भुजबळ फार्म येथील कार्यालयात हा गौरव करण्यात आला.

वारंगल तेलंगणा येथे पार पडलेल्या 60 व्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत महाराष्ट्र राज्याला एकूण पाच पदके मिळाली. त्यातील 4 पदके ही नाशिकच्या खेळाडूंना मिळाली आहेत. तसेच दिल्ली येथे झालेल्या 23 व्या नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत महाराष्ट्राला एकूण 8 पदके मिळाली त्यातील 6 पदके नाशिकच्या खेळाडूंना मिळाली आहेत. यामध्ये संजीवनी जाधव हिला 1 गोल्ड, 1 सिल्व्हर मेडल, कोमल जगदाळे हिला 2 गोल्ड व 2 सिल्व्हर मेडल, आदेश यादव यास 1 गोल्ड, किसन तडवी यास 1 गोल्ड तर अजय राठी यास 1 गोल्ड व 2 सिल्व्हर मेडल मिळाले आहे. या सर्व खेळाडूंचा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी सर्व खेळाडूंना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी क्रीडा प्रशिक्षक विजेंद्र सिंग, अनिल वाघ, हेमंत देशपांडे उपस्थित होते. या खेळाडूंना नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा व कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व महेंद्रा यांचे सहकार्य लाभले.

कोमल राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

नाशिकच्या भोंसला खेलो इंडिया व एक्सलन्स सेंटरची धावपटू कोमल जगदाळने राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. महिलांच्या तीन हजार स्टिपलेस प्रकारात ती अजिंक्य ठरली. त्यामुळे तिचे कौतुक होत असून, या यशाने ती आता 2022 मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठीही पात्र ठरली आहे. कोमल जगदाळे ही लांब पल्ल्यांची धावपटू आहे. या स्पर्धेत तिने तीन हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात हे अंतर 9 मिनिटे आणि 51.56 सेकंदात पार केले. या यशाबद्दल कोमलचे कौतुक होत आहे. यापूर्वी तिने याच स्पर्धेत महिलांच्या पाच हजार मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

आदेशचीही बाजी

दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या गटात नाशिकच्या भोंसला खेलो इंडिया व एक्सलन्स सेंटरचा धावपटू आदेश यादवनेही सुवर्णपदक पटकावले आहे. आदेश यादवने 14:12:36 या वेळेत अंतर कापले. पुरुष गटात उत्तर प्रदेशच्या प्रिन्सकुमारने रौप्यपदक पटकावले. त्याने 14:17:37 या वेळेत अंतर कापले. अजय राठीने 14:21:41 इतक्या वेळेत अंतर कापले. त्याला कांस्यपदक पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत यश मिळवल्याने आदेश यादव ही 2022 मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

इतर बातम्याः

नाशिककरांनो मतदार नाव नोंदणी, दुरुस्ती करायची असल्यास ही कागपत्रे करा सादर!

पुन्हा वांदेः ‘डीपीसी’वरून आमदार कांदेंचा पंगा सुरूच; निधी वर्ग करू नका, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत थेट आत्मदहनाचा इशारा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.