AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubman Gill : दुसऱ्या कसोटीत कॅप्टन शुबमन गिलकडून घोडचूक ! एका फोटोमुळे BCCIचं कोट्यवधींचं नुकसान ?

Shubman Gill Big Mistake In England Test: कर्णधार शुबमन गिलने इंग्लंड दौऱ्यातील दुसऱ्या टेस्टमध्ये शानदार फलंदाजी करत सर्वांचंच मन जिंकून घेतलं. पण याचदरम्यान आता भारतीय कर्णधाराने एक मोठी चूक केली आहे, ज्याचे परिणाम बीसीसीआयला भोगावे लागू शकतात.

Shubman Gill : दुसऱ्या कसोटीत कॅप्टन शुबमन गिलकडून घोडचूक ! एका फोटोमुळे BCCIचं कोट्यवधींचं नुकसान ?
शुबमन गिलची घोडचूक बीसीसआयला नडणार ?Image Credit source: social media
| Updated on: Jul 07, 2025 | 10:04 AM
Share

Shubman Gill Break Rule of BCCI : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल इंग्लंड दौऱ्यावर वर्चस्व गाजवत आहे. गिलने दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी करत धावांचा डोंगर उभारला. शुबमन गिलने लीड्स आणि एजबॅस्टन कसोटीत एकत्रितपणे 585 धावा केल्या आहेत. त्याची बॅट तळपत असूनही सध्या हाच कर्णधार, अर्थात शुभमन गिल हा एका वादात अडकला आहे. दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी गिलने एक मोठी चूक केली, ज्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) त्याच्या या चुकीचा मोठा फटका सहन करावा लागू शकतो.

गिलकडून ब्लंडर

दुसऱ्या कसोटीतील भारताच्या दुसऱ्या डावात शुबमन गिल जेव्हा डाव घोषित करण्यासाठी आला तेव्हा भारतीय कर्णधाराने काळ्या रंगाचा Nike ब्रँडचा बनियान घातला होता. पण बीसीसीआयचा तर Nike शी करार नाही, तर ॲडिडास कंपनीशी करार आहे. भारतीय खेळाडूंच्या जर्सीवरही या कंपनीचा लोगो छापलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आणि Adidas यांच्यातील हा करार मार्च 2028 सालापर्यंत आहे. हा जर्मन ब्रँड भारताच्या पुरुष, महिला आणि युवा संघांसाठी सर्व फॉरमॅटसाठी किट्स बनवतो. Adidas ही बीसीसीआयची एक प्रमुख प्रायोजक कंपनी आहे.

huge blunder by Captain Shubaman Gill BCCI may have to bare loss of crores of rupees

BCCI ला होणार कोट्यवधींचं नुकसान ?

Adidas ही बीसीसीआयची प्रायोजक कंपनी आहे, त्यामुळे संघातील खेळाडूंना फक्त याच कंपनीची जर्सी घालण्याचा नियम लागू होतो, परंतु कर्णधार शुबमन गिलने हा नियम मोडला आहे.2023 साली आदिदास आणि बीसीसीआयमध्ये हा 250 कोटी रुपयांचा झाला होता. त्यामुळे आता शुबमन गिलच्या चुकीवर Adidas काय कारवाई करेल याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एकीकडे Adidas हा करार रद्द करू शकते, ज्यामुळे बीसीसीआयला कोट्यवधींचे नुकसान होईल. परंतु प्रायोजक कंपनीलाही या कराराचा खूप फायदा होत असतो. त्यामुळे हे नुकसान करण्यापेक्षा अशा परिस्थितीत, सध्या कंपनी बीसीसीआय आणि गिल यांना एक इशारा देऊन सोडून देऊ शकते.

टीम इंडियाचा 336 धावांनी विजय

बर्मिंगहॅममधील दुसख्आ कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडचा 336 धावांनी धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला. टीम इंडियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी सुरेख खेळ करत इंग्लंडला 271 धावांत गुंडाळत विजय मिळवला. या कसोटीत कर्णधार शुबमन गिलने ऐतिहासिर द्विशतकी खेळी केली.

सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?
सरपंच हत्येप्रकरणी मोठी अपडेट आल्यानंतर धनंजय देशमुख यांची मागणी काय?.
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर..
संतोष देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकमांकडून मोठी अपडेट, कराडसह आरोपींवर...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.