2003 चा विश्वचषक विनाविकेटकीपर खेळणाऱ्या भारतीय संघात यंदा पाच विकेटकीपर!

युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पंतच्या निवडीमुळे विश्वचषक दौऱ्यावरील टीम इंडियाच्या ताफ्यात पाचव्या विकेटकीपरचा समावेश झाला आहे.

2003 चा विश्वचषक विनाविकेटकीपर खेळणाऱ्या भारतीय संघात यंदा पाच विकेटकीपर!
Follow us
| Updated on: Jun 20, 2019 | 10:28 AM

मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पंतच्या निवडीमुळे विश्वचषक दौऱ्यावरील टीम इंडियाच्या ताफ्यात पाचव्या विकेटकीपरचा समावेश झाला आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघात सध्या महेंद्रसिंह धोनी नियमित विकेटकीपिंग करतो. त्याशिवाय दिनेश कार्तिकही भारताच्या ताफ्यात आहे. आयपीएलमध्ये विकेटकीपिंगची धुरा यशस्वी सांभाळणारा सलामीवीर लोकेश राहुल, तर पार्ट टाईम विकेट कीपिंग करणारा केदार जाधव आणि आता ऋषभ पंतच्या निमित्ताने पाचवा विकेटकीपर भारतीय संघात दाखल झाला आहे.

क्रिकेट जाणकार मोहनदास मेनन यांनी चार विकेटकीपर्सची नावं ट्विट केली. यामध्ये धोनी, कार्तिक, पंत आणि राहुलचा समावेश होता. मात्र अन्य युजर्सनी त्यात केदार जाधवच्या नावाची भर घातली.

एक काळ असा होता, भारतीय संघाला चांगला विकेटकीपरच मिळत नव्हता. त्यामुळेच 2003 च्या विश्वचषकात भारत नियमित विकेटकीपरशिवाय खेळला होता. इतकंच नाही तर भारताने फायनलमध्येही धडक दिली होती. त्यावेळी संपूर्ण वर्ल्डकप स्पर्धेत राहुल द्रविडने विकेटकीपिंग केली होती. द्रविड नियमित कीपर नव्हता, तरीही सौरव गांगुलीने त्याच्यावर विश्वास ठेवून ती जबाबदारी सोपवली होती.

2003 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात तत्कालिन युवा विकेटकीपर पार्थिव पटेलची निवड केली होती. त्यावेळी पार्थिव केवळ 17 वर्षांचा होता. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या त्या वर्ल्डकपदरम्यान पार्थिवची निवड झाली होती, मात्र त्याला एकाही सामन्यात खेळवलं नव्हतं. संपूर्ण स्पर्धेत राहुल द्रविडनेच विकेटकीपिंग केली होती.

मात्र यंदाच्या विश्वचषकात भारताचा निम्मा संघ विकेटकीपर्सनी भरला आहे असं म्हटल्यास वावगं ठरु नये. धोनी, कार्तिक, पंत हे नियमित विकेटकीपर आहेत. तर के एल राहुल आणि केदार जाधव या दोघांनी आयपीएलमधील आपली विकेटकीपिंगची चमक दाखवली आहे. त्यामुळे हे दोघेही विकेटकीपिंग करु शकतात.

शिखर धवन बाहेर

दरम्यान, वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो तीन आठवड्यांसाठी संघाबाहेर झाला होता. पाकिस्तानविरुद्ध 16 जून रोजी झालेल्या सामन्यातही तो खेळू शकला नव्हता. धवनऐवजी विजय शंकरला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. आता धवन संपूर्ण स्पर्धेतूनच बाहेर पडला आहे. धवनऐवजी युवा फलंदाज ऋषभ पंतचा (Rishabh Pant) भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. पंत सध्या इंग्लंडमध्येच आहे. आगामी सामन्यांसाठी तो भारतीय संघात असेल.

संबंधित बातम्या 

World Cup 2019 : ‘मेन इन ब्लू’ आता भगव्या रंगात?  

World Cup 2019 : ICC ने विचारलं, कुणाचा सिक्सर चांगला, सचिन म्हणाला आमची मुंबई!  

World Cup 2019 : शिखर धवन वर्ल्ड कपमधून बाहेर, ऋषभ पंत भारतीय संघात  

नव्या इनिंगसाठी युवराज सिंहने पुन्हा बीसीसीआयचे दार ठोठावलं!  

Shoaib Akhtar Sonali Bendre : सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेयरच्या चर्चेवर शोएब अख्तरने मौन सोडलं 

Non Stop LIVE Update
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.