Aaryavir Sehwag : सेहवागचा मुलगा आर्यवीरची डेब्यू मॅचमध्ये कमाल, बापासारखा लेक, गोलंदाजाची लावली वाट VIDEO
Aaryavir Sehwag : दिल्ली प्रीमियर लीगचा (डीपीएल) 2025 39 वा सामना ईस्ट दिल्ली रायडर्स आणि सेंट्रल दिल्ली किंग्सच्या टीममध्ये झाला. या सामन्यात वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागला डेब्यु करण्याची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यापासून आर्यवीरची सगळीकडे चर्चा सुरु झालीय.

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागने दिल्ली प्रीमियर लीग (DPL) 2025 मध्ये डेब्यू केलाय. अगदी पहिल्या सामन्यापासून आर्यवीरने सर्वांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलय. जवळपास एका दशकानंतर सेहवाग आडनावाची दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये चर्चा झाली. यावेळी वीरेंद्रच्या जागी तिथे मुलगा आर्यवीर होता. आर्यवीर सेहवागने पहिल्याच T20 सामन्यात शानदार प्रदर्शन केलं. आर्यवीरच्या इनिंगच वैशिष्ट्य म्हणजे त्याने वडिलांप्रमाणे स्फोटक फलंदाजी केली. आंतरराष्ट्रीय गोलंदाजाविरुद्ध धावा बनवल्या.
दिल्ली प्रीमियर लीग 2025 मध्ये 39वा सामना ईस्ट दिल्ली रायडर्स आणि सेंट्रल दिल्ली किंग्स टीम्स दरम्यान झाला. आर्यवीरला या मॅचमध्ये ढुलच्या जागी खेळण्याची संधी मिळाली. ढुल दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार आहे, म्हणून तो संघाचा भाग नाहीय. सेंट्रल दिल्ली किंग्सकडून आर्यवीरने ओपनिंग केली. त्याने 16 चेंडूत 22 धावा केल्या. त्याच्या इनिंगमध्ये चार चौकार होते. त्याने चौथ्या चेंडूवर थर्ड मॅनला एक धाव घेऊन सुरुवात केली. त्यानंतर अनुभवी गोलंदाज नवदीप सैनी विरोधात आक्रमक फलंदाजी केली.
डीप एक्स्ट्रा कवरच्या वरुन चौकार
आर्यवीर सेहवागने सैनीच्या पहिल्याच चेंडूवर डीप एक्स्ट्रा कवरच्या वरुन चौकार मारला. चेंडू इनफील्डच्या वरुन ऑफसाइडला गेला. पुढच्या चेंडूवर त्याने एक्स्ट्रा कवर आणि लॉन्ग-ऑफच्या मधून चेंडू पंच केला. सलग दुसरा चौकार मारला. त्यानंतरही तो थांबला नाही. स्पिनर रौनक वाघेला विरुद्ध पहिला चौकार थर्ड मॅन आणि दुसरा लॉन्ग-ऑनच्या दिशेने मारला. पण याच ओव्हरमध्ये तो बाद होऊन तंबूत परतला.
उदयोन्मुख स्टार
18 वर्षाच्या आर्यवीरने याआधी वीनू मांकड़ ट्रॉफीमध्ये डेब्यु करताना 49 रन्स केल्या होत्या. कूच बिहार ट्रॉफीमध्ये मेघालय विरुद्ध 229 चेंडूत नाबाद 200 आणि दुसऱ्यादिवशी 309 चेंडूत 297 रन्स ठोकून सर्वांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. या प्रदर्शनामुळे डीपीएल ऑक्शनमध्ये त्याच्याकडे एक उदयोन्मुख स्टार म्हणून पाहिलं गेलं. आता डीपीएलमधअये मिळालेल्या संधीचा त्याने अचूक लाभ उचलला.
View this post on Instagram
मुलाच्या फलंदाजीतही तीच झलक
वीरेंद्र सेहवाग जेव्हा भारताकडून खेळायचा, तेव्हा प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांची खैर नसायची. सेहवाग त्यांची गोंलदाजी फोडून काढायचा. आता मुलाच्या फलंदाजीतही तीच झलक दिसतेय.
