IND vs SA : सूर्यासेनाचा दणदणीत विजय, दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी धुव्वा
India vs South Africa, Warm Up Match Result : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडवर डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या सराव सामन्यात 30 धावांनी विजय मिळवला आहे. भारताने यासह वर्ल्ड कप स्पर्धेसाठीची तयारी आणखी मजबूत केली आहे.

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील दहाव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 30 धावांनी मात केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेला विजयी धावांचा पाठलाग करताना 7 विकेट्स गमावून 210 धावाच करता आल्या. अशाप्रकारे टीम इंडियाने वर्ल्ड कपआधी एकमेव सराव सामना जिंकला. आता टीम इंडिया या मोहिमेत 7 फेब्रुवारीला आपला पहिला सामना खेळणार आहे. टीम इंडिया या सामन्यात यूएसए विरुद्ध खेळणार आहे.
टीम इंडियाची बॅटिंग
कर्णधार सूर्यकुमार यादव याने बॅटिंगचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी याचा पूर्ण फायदा घेतला. भारतासाठी एकूण 8 जणांनी बॅटिंग केली. हर्षित राणा झिरोवर नाबाद परतला. तर रिंकु सिंह याने 16 धावांचं योगदान दिलं. या व्यतिरिक्त इतर 6 फलंदाजांनी 20 पेक्षा अधिक धावा केल्या. तसेच इतर फलंदाजांना संधी मिळावी यासाठी काही खेळाडू हे रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेले.
इशान किशन याने 53 धावा केल्या. तर अभिषेक शर्मा याने 24 धावांचं योगदान दिलं. इशान आणि अभिषेक दोघेही रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर गेले. त्यानंतर तिलक वर्मा याने 45 धावा जोडल्या. कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या या दोघांनी प्रत्येकी 30-30 धावा केल्या. रिंकी सिंह याने 16 धावा जोडल्या. तर अक्षर पटेल 35 धावा करुन नाबाद परतला. तर दक्षिण आफ्रिकेसाठी 4 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
दक्षिण आफ्रिकेचा संघर्ष व्यर्थ
दक्षिण आफ्रिकेकडून या डोंगराएवढ्या धावांच पाठलाग करताना फक्त 5 जणांनाच 20 पार पोहचता आलं. जॉर्ज लिंडे भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. डेवाल्ड ब्रेव्हीस याने 2 धावा केल्या. कॅप्टन आणि ओपनर एडन मार्करम याने 38 धावांचं योगदान दिलं. विकेटकीपर रायन रिकेल्टन याने 44 धावा केल्या. डेव्हीड मिलर याला 13 धावाच करता आल्या. जेसन स्मिथ याने 35 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. मार्को यान्सेनने 31 रन्स केल्या.
ट्रिस्टन स्टब्सची फटकेबाजी
ट्रिस्टन स्टब्स याने अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी केली. स्टब्सने मोठे फटके मारले. स्टब्स दक्षिण आफ्रिकेला विजयी करण्यात अपयशी ठरला. मात्र स्टब्सने फटकेबाजी करुन पराभवातील अंतर नक्कीच कमी केलं. स्टब्सने 21 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 1 फोरसह नॉट आऊट 45 रन्स केल्या. तर बॉश 2 धावांवर नाबाद परतला.
भारताकडून एकूण 9 जणांना बॉलिंगची संधी
टीम इंडियाकडून कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि विकेटकीपर इशान किशन याचा अपवाद वगळता इतर 9 जणांनी बॉलिंग केली. अभिषेक शर्मा याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या. तर अर्शदीप सिंह, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
