India vs England 2021 | इंग्लंडला मोठा धक्का, हुकमाचा एक्का जायबंदी, दुसऱ्या कसोटीला मुकणार

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील (India vs England 2021) दुसरा कसोटी सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये 13 फेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहे.

India vs England 2021 | इंग्लंडला मोठा धक्का, हुकमाचा एक्का जायबंदी, दुसऱ्या कसोटीला मुकणार
इंग्लंड टीम

चेन्नई : टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी (India vs England Test Series 2021) इंग्लंडला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा हुकमाचा एक्का दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे त्याला टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकावे लागणार आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला (Jorfra Archer) दुखापत झाली आहे. यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीत खेळता येणार नाहीये. इंग्लंड क्रिकेट प्रशासनातर्फे (England Cricket Board) याबाबतची माहिती देण्यात आली आहे. (india vs england 2021 jofra archer ruled out to 2nd test against team india due to elbow pain)

जोफ्रा आर्चरला पहिल्याच टेस्ट मॅचदरम्यान उजव्या हाताच्या कोपऱ्याला त्रास जाणवत होता. मात्र आता आणखी त्रास वाढल्याने जोफ्राला इंजेक्शन घ्यावे लागले. आर्चरला डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे तो दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नसणार असल्याचं टीम मॅनेजमेंटकडून सांगण्यात आलं. जोफ्राने पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 2 तर दुसऱ्या डावात 1 असे 3 विकेट्स घेऊन इतर गोलंदाजांना चांगली साथ दिली होती.

आर्चरच्या जागी संधी कोणाला?

आर्चरला दुखापत झाल्याने त्याच्या जागी कोणाला संधी देण्यात येईल, याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्याच्या जागी अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट बॉर्डला संधी मिळण्याची तीव्र शक्यता आहे. दरम्यान पहिल्या कसोटीत इंग्लंडने टीम इंडियावर 227 धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंड 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. या मालिकेतील दुसरा सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार

कोरोना संसर्गानंतर टीम इंडिया या कसोटी मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा भारतात खेळत आहे. कोरोनामुळे जगभरात क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामना पाहता येत नव्हता. मात्र इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामन्याचा आनंद घेता येणार आहे. एकूण क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे. यावेळेस प्रेक्षकांना कोरोनाच्या सर्वच नियमांचे पालन करावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs England | टीम इंडियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा

India vs England 2021 | कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक, दोन्ही संघ, Full schedule

(india vs england 2021 jofra archer ruled out to 2nd test against team india due to elbow pain)

Published On - 11:29 am, Fri, 12 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI